प्लास्टिक बंदीमुळे फेरीवाल्यांचं ‘हे’ प्लास्टिक होणार बंद!

प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी राज्यसरकाने संपूर्ण राज्यभरात प्लास्टिक बंदी केली आहे. मात्र तरीही दादर आणि माटुंगा या ठिकाणी प्लास्टिकचा सर्रास वापर केल्याचे दिसून येत आहे.

Mumbai

पर्यावरणाचा ऱ्हास करणारे प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी राज्यसरकाने संपूर्ण राज्यभरात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू केली आहे. प्लास्टिक वापरणाऱ्यांवर सरकाने दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे फेरीवाल्यांच्या प्लास्टिकवर गदा आली आहे.