घरक्रीडादुखापत होऊनही 'ती' खेळली आणि जिंकली!

दुखापत होऊनही ‘ती’ खेळली आणि जिंकली!

Subscribe

अंकिताने दोन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन एकामध्ये गोल्ड पदक तर दुसऱ्या मध्ये सिल्वर पदक मिळविले. दरम्यान, खेळ सुरु असताना तिच्या मानेला जबर दुखापत होते. पण ती तरीही डगमगली नाही.

रशियामध्ये ‘फर्स्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप अल्फागुथ तुराण मार्शल आर्ट’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा २४ आणि २५ नोव्हेंबला आयोजित करम्यात आली होती. या स्पर्धेमध्ये जगभरातील २२ देशातील खेळाडू आले होते. भारतातून चार खेळाडू या स्पर्धेसाठी गेले होते. यामध्ये अंकिता चव्हाण ही एकमेव मुलगी होती. अंकिताने दोन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन एकामध्ये गोल्ड पदक तर दुसऱ्या मध्ये सिल्वर पदक मिळविले. दरम्यान, खेळ सुरु असताना तिच्या मानेला जबर दुखापत होते. पण ती तरीही डगमगली नाही.

भारतात आल्यावर उपचार

अंकिता ही ठाण्याच्या श्रीनगर परिसरात वास्तव्यास आहे. मुलुंडच्या वर्ल्ड कुनाकोशी शोटोकान कराटे ऑर्गनायझेशनच्या वतीने ही मुले रशिया येथे स्पर्धा खेळण्यास गेली होती. या स्पर्धेसाठी लागणारा खर्च हा स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून मिळवला जातो. परंतु, अंकिता गोवा येथे स्पर्धा खेळण्यास गेल्यामुळे तिला पैसे जमवता आले नाही. परंतु तिच्या वडिलांनी पैसे उभे करून मुलीला स्पर्धा खेळण्यास पाठविले. हा खर्च जवळजवळ दीड लाखाच्यापेक्षा जास्त आला आहे. या स्पर्धेमध्ये खेळताना अंकिताच्या मानेला जबर दुखापत झाली आहे. परंतु, तरीही तिने पदक मिळवले. भारतात आल्यावर तिच्या मानेवर उपचार सुरु करण्यात आले आहे. ही तरुणी ३ डिसेंबरला भारतात आली. यावेळी तिच्या स्वागतासाठी तिचे आई-वडील आणि अन्य २० ते २५ जण विमानतळावर आले होते. तिच्या या यशानंतर ठाण्यात स्थानिक नगरसेवक आणि महापौर यांनी तिचा सत्कार केला आहे.

- Advertisement -

काय म्हणाली अंकिता?

तिसरीमध्ये असताना आपल्याला कराटे खेळाचे आकर्षण होते. त्यामुळे ती या खेळाकडे वळली, असे तीने सांगितले आहे. अंकिताने सांगितले की, सध्या मुलांवर होणाऱ्या अत्याचाराची चीड येते. त्यामुळे मुलींना कराटेचे योग्य धडे देऊन त्यांना घडवायचे आहे. शिवाय, मुलींनी स्वयंरक्षणासाठी कराटे खेळ शिकावा, असा सल्ला तिने मुलींना दिला आहे.

देशात उत्तम दर्जेदार खेळाडू आहेत सरकारने अश्या खेळाडूंना खेळण्यासाठी आर्थिक मदत केली पाहिजे, आज जर अंकिता गेली नसती, तर देशासाठी गोल्ड, सिल्वर पदक घेऊन आली नसती – अंकिताचे वडील जयवंत चव्हाण


हेही वाचा – जगातील टॉप मार्शल आर्टिस्टमध्ये विद्युत जामवालचा समावेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -