घरक्रीडाAsia Cup – Ind vs Afg live updates : सामना बरोबरीत संपला

Asia Cup – Ind vs Afg live updates : सामना बरोबरीत संपला

Subscribe

आशिया चषकात आज भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. भारताने याआधीच स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली असल्याने संघात ५ बदल झाले आहेत.

  • भारताला विजयासाठी १ धाव आवश्यक असताना जडेजा चुकीचा फटका मारल्याने बाद झाला. त्यामुळे हा सामना बरोबरीत संपला.
  • भारताच्या मधल्या फळीला चांगले प्रदर्शन करता आले नाही. 
  • पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाल्यानंतर भारताने रायडू, राहुल आणि धोनी यांच्या विकेट झटपट गमावल्या आहेत.
  • भारताने आपल्या फलंदाजीची अप्रतिम सुरुवात केली आहे. भारताचे सलामीवीर अंबाती रायडू आणि लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी केली आहे.
  • सलामीवीर मोहम्मद शहजादच्या १२४ धावा आणि अष्टपैलू मोहम्मद नबीच्या ६४ धावांच्या जोरावर अफगाणिस्तानने ५० षटकांनंतर ८ बाद २५२ धावा केल्या आहेत.
  • चांगल्या सुरुवातीनंतर अफगाणिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. बिनबाद ६५ वरून त्यांची अवस्था ४ बाद ८२ अशी झाली आहे. कुलदीप आणि जडेजाने २-२ विकेट घेतल्या आहेत. 
  • चांगल्या सुरूवातीनंतर जडेजाने अफगाणिस्तानला पहिला झटका दिला आहे. त्याने जावेद अहमदीला बाद केले.
  • अफगाणिस्तानने सामन्याची दमदार सुरुवात केली आहे. त्यांच्या सलामीवीरांनी १२ शतकांत ६५ धावा फलकावर लावल्या आहेत. 
  • त्यांच्या जागी लोकेश राहुल, मनीष पांडे, दीपक चहार, सिद्धार्थ कौल आणि खलील अहमद यांना संधी मिळाली आहे.
  • भारताने या सामन्यात पाच बदल केले आहे. कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर आणि चहाल यांना विश्रांती देण्यात आली आहे. 
  • या सामन्यात महेंद्रसिंग धोनी ६९६ दिवसांनी पुन्हा भारताचे कर्णधारपद भूषवतो आहे. 
  • आशिया चषकाच्या ‘सुपर ४’ फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -