घरक्रीडाटीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं काय होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलिया, प्रसारकांत वाद   

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं काय होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलिया, प्रसारकांत वाद   

Subscribe

वादाचा परिणाम भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होण्याची शक्यता आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियात क्रिकेट सामन्यांचे प्रसारण करणारी वाहिनी ‘चॅनल ७’ यांच्यातील वाद शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. या दोघांमध्ये मागील काही आठवड्यांपासून सातत्याने वाद होत आहेत. हा वाद आता कोर्टापर्यंत पोहोचला असून चॅनल ७ वाहिनी क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत असलेला करार रद्द करण्यास उत्सुक आहे. मात्र, आम्हाला अजून कोर्टाची कोणतीही नोटीस न मिळाल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात येत आहे. या वादाचा परिणाम भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियात विविध निर्बंध

कोरोनामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मोठे नुकसान झाले असून ते सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे चॅनल ७ आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यात बरेच वाद होत आहेत. त्यातच भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामुळे हा वाद अधिकच चिघळला असल्याची माहिती आहे. कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात विविध निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अजून भारतीय संघाचा दौरा निश्चित केलेला नाही.

- Advertisement -

वेळापत्रक बनवताना अडचणी

क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या दौऱ्याचे वेळापत्रक बनवताना बऱ्याच अडचणी येत आहेत. त्यांनी सुरुवातीला वेळापत्रक जाहीर केले, पण ते निश्चित नसून त्याबाबत अजूनही चर्चा सुरु आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० सामने ब्रिस्बन येथे व्हावेत असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला वाटत आहे. तर कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने अ‍ॅडलेड आणि अखेरचे दोन सामने सिडनी येथे घेण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया विचार करत आहे. मात्र, अ‍ॅडलेडने अजूनही सामन्यांचे आयोजन करण्याची तयारी दर्शवलेली नाही. त्यामुळेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि चॅनल ७ यांच्यातील वाढत असून याचा परिणाम भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही होऊ शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -