घरक्रीडाDenmark Open : श्रीकांतची विजयी सलामी

Denmark Open : श्रीकांतची विजयी सलामी

Subscribe

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या हॅन्स-क्रिस्टियन सोलबर्ग विटिंगहॉस याचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने डेन्मार्क ओपन स्पर्धेला विजयी सुरूवात केली आहे. त्याने या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या हॅन्स-क्रिस्टियन सोलबर्ग विटिंगहॉस याचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

दुसऱ्या फेरीत लिन डॅनशी सामना

पहिल्या फेरीच्या सामन्यात श्रीकांतने हॅन्स-क्रिस्टियन सोलबर्ग विटिंगहॉसचा २१-१६, २१-१० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या सामन्याच्या पहिल्या सेट जिंकण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागली. पण त्याने हा सेट २१-१६ असा जिंकला. तर दुसऱ्या सेटच्या सुरूवातीपासूनच श्रीकांतने विटिंगहॉसवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे त्याने हा सेट २१-१० असा मोठ्या फरकाने जिंकत हा सामनाही जिंकला. दुसऱ्या फेरीत त्याचा सामना चीनचा महान खेळाडू लिन डॅन याच्याशी होईल. लिन डॅन आणि श्रीकांत यांच्यात आतापर्यंत चार सामने झाले आहेत. त्यापैकी तीन सामने डॅनने तर एक सामना श्रीकांतने जिंकला आहे.

महिला दुहेरीमध्ये संमिश्र निकाल

महिला दुहेरीमध्ये भारतीय जोडी अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी यांनी अमेरिकन जोडी एरियल ली आणि सिडनी ली यांचा २१-७, २१-११ असा सरळ सेटमध्ये पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. मात्र मेघना जक्कमपुडी आणि पूर्विशा राम या भारतीय जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा स्वीडिश जोडी एमा कार्लसन आणि जोआना मॅग्नसन यांनी १७-२१, ११-२१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -