घरक्रीडाIPLच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले 'मंकड'; अश्विन ठरतोय चिडका खेळाडू

IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले ‘मंकड’; अश्विन ठरतोय चिडका खेळाडू

Subscribe

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मंकड पद्धतीने एखाद्या बॅट्समनला आऊट करण्यात आले आहे. त्यामुळे आर. आश्विनवर चहुबाजूंनी टीका देखील होत आहे.

आयपीएलच्या १२ व्या पर्वाला २३ मार्च पासून सुरुवात झाली आहे. काल (सोमवारी) राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये जयपूर येथे पहिला सामना रंगला. राजस्थान रॉयल्सने अवघ्या १४ रन्सनी हा सामना गमावला. मात्र या सामन्यात IPL च्या इतिहासात आतापर्यंत न घडलेली गोष्ट घडली, त्याची चर्चा यंदाचे पर्व संपेपर्यंत होत राहील पंजाबचा कप्तान आर. अश्विनने बॉलिंग टाकत असताना राजस्थानचा धडाकेबाज बॅट्समन जोस बटलरला मंकड पद्धतीने आऊट केले. अशा पद्धतीने कुणालाही आऊट करण्याची आयपीएलमधील ही पहिलीच वेळ आहे. अश्विनच्या मंकडमुळे राजस्थानला आपल्या हातातला सामना गमवावा लागला.

मंकड पद्धत म्हणजे नक्की काय

क्रिकेटच्या नियमानुसार नॉन स्ट्राइक एंडवर असलेला बॅट्समन जर बॉलरने बॉल टाकण्याच्या आधीच क्रिज सोडून पळत असेल तर बॉलर तिथले स्टम्प उडवून त्याला आऊट करु शकतो. याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मंकड पद्धत म्हणतात. फार कमी वेळा अशा पद्धतीने एखाद्या बॅट्समनला आऊट केले जाते. विशेषतः एखादा बॅट्समन बॉल टाकण्याच्या आधीच क्रिज सोडत असेल तर बॉलरने ही गोष्ट मैदानावरील अम्पायरच्या निदर्शनास आणून दिली पाहीजे. अम्पायर बॅट्समनला समज देतो. मात्र आर. अश्विनने थेट बटलरला आऊट केल्यामुळे त्याच्यावर आता टीकेची झोड उठवली जात आहे.

- Advertisement -

अश्विनवर टीका

अश्विनच्या चलाखीमुळे किंग्ज इलेव्हनने सामना जिंकला असला तरी सोशल मीडिया आणि क्रिकेट वर्तुळात मात्र त्याला टीकेला सामोरे जावे लागत आहे. अश्विनमध्ये स्पोर्ट्समन स्पिरीट नाही, अशी टीका काहींनी केली. यामध्ये क्रिकेट जगतातील जेसन रॉय, मोहम्मद कैफ, डेल स्टेन आणि समालोचक आकाश चोप्राचा समावेश आहे.

- Advertisement -

सामन्याचा लेखा जोखा

किंग्ज इलेव्हनने पहिल्यांदा बॅटिंग करताना राजस्थानसमोर १८५ रन्सचे आव्हान ठेवले होते. या टार्गेटचा पाठलाग करत असताना सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि जोस बटलरने आक्रमक खेळी करायला सुरुवात केली. मात्र ९ व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर राजस्थानचा कप्तान अजिंक्य रहाणे २७ रन्सवर बाद झाला. त्यानंतर बटलर आणि संजू सॅमसनने संयमी खेळी करत डाव पुढे नेला. मात्र तेराव्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर आर. अश्विनने नॉन स्ट्राईक एंडवर उभ्या असलेल्या बटलरला मंकड पद्धतीने आऊट केले. त्यावेळी बटलरने ४३ चेंडूत ६९ रन्स ठोकले होते.

बटलर चुकीच्या पद्धतीने आऊट झाला या भावनेतून राजस्थानचे बॅट्समन बाहेर येऊ शकले नाही. त्यानंतर एकापाठोपाठ राजस्थानच्या विकेट्स पडतच गेल्या आणि सुरुवातील सहज वाटणारा विजय हातातून निसटत गेला. शेवटच्या ओव्हरमध्ये राजस्थानला ६ बॉलमध्ये २१ रन्सची आवश्यकता होती. वीस ओव्हरनंतर राजस्थान ९ विकेटच्या जोरावर फक्त १७० धावा करु शकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -