IND VS WI 2nd T-20 : विंडीजचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय; भुवनेश्वरचे पुनरागमन

दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Lucknow
bhuvi
भुवनेश्वर कुमार

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज होत आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. विंडीजने रोवमान पॉवेलच्या बदली निकोलस पुरन या युवा खेळाडूला संधी दिली आहे. तर पहिला टी-२० सामना जिंकणाऱ्या भारतानेही संघात एक बदल केला आहे. भारताने उमेश यादवच्या जागी भुवनेश्वर कुमारला संघात स्थान दिले आहे.


हा सामना लखनऊच्या ‘भारतरत्न श्री. अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअम’मध्ये होणार आहे. हा या स्टेडिअमवरील पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here