घरक्रीडापहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा इंग्लंडवर दमदार विजय

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा इंग्लंडवर दमदार विजय

Subscribe

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर तब्बल ८ विकेट्सने विजय मिळवत विजयाचे खाते खोलले आहे. या विजयात मोलाचा वाटा भारताचा फिरकी गोलंदाज कुलदिप यादव आणि हिटमॅन रोहित शर्मा यांचा ठरला. पहिल्या इंनिगमध्ये कुलदिपने ६ विकेट घेत इंग्लंडला २६८ धावांत रोखला. तर दुसऱ्या इंनिगमध्ये रोहित शर्माच्या शतकाने भारताचा विजय सोपा केला. रोहितने नाबाद १३७ धावांची खेळी केली आहे.

भारताकडून ऑलराऊंडर खेळी

भारताने मॅचमध्ये अप्रतिम बॉलिंगसह धमाकेदार बॅटिंग करत एकप्रकारे ऑलराऊंडर खेळी केली. पहिल्या इंनिगमध्ये भारताचा फिरकी गोलंदाज कुलदिपने ६ तर उमेश यादवने २ आणि युझवेंद्र चहलने १ विकेट घेत तर  इंग्लंडला २६८ धावांत ऑलआउट केला. तर दुसऱ्या इंनिगमध्ये हिटमॅन रोहित शर्माने नाबाद १३७ धावा करत अप्रतिम शतक झळकावले. त्याचसोबत कर्णधार कोहलीने ७५ धावांचा डोंगर उभा केला. भारताच्या या अप्रतिम अष्टपैलू खेळामुळे भारताने सामन्यात दमदार विजय मिळवला.

- Advertisement -

हिटमॅनची धडाकेबाज सेंच्युरी

भारताचा हिटमॅन अशी ओळख असणाऱ्या रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यातीलं आपले दुसरं शतकं ठोकले आहे.याआधी तिसऱ्या टी-२० मध्ये रोहितने ५६ बॉलमध्ये नाबाद १०० धावा करत शतक झळकावला होता. तर आज ११५ बॉलमध्ये १५ फोर आणि ४ सिक्ससह रोहितने नाबाद १३७ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने या धावा ११८ च्या सरासरीने केल्या आहेत.

- Advertisement -

कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लंडची दांडी गुल

कुलदीप यादवने सामन्या सहा विकेट घेत अप्रतिम खेळ दाखवला आहे. कुलदिपच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंड २६८ धावाच करू शकला आहे. विशेष म्हणजे कुलदिपने १० ओव्हरमध्ये केवळ २५ धावा देत तब्बल ६ विकेट पटकावल्या आहेत. कुलदिपच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत ही त्याची बेस्ट इंनिग ठरली आहे.

-kuldeep-yadav
कुलदीप यादव

भारताने टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने जिंकल्यानंतर आता तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत पहिला सामना जिंकत १-० चा आघाडी घेतली आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -