घरक्रीडाऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेसाठी गेलेल्या मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन

ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेसाठी गेलेल्या मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन

Subscribe

क्वारंटाईनच्या नियमांमुळे सिराजने मायदेशात न परतण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून लवकरच या दोन संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी भारताच्या इतर खेळाडूंसह सिराज ऑस्ट्रेलियात दाखल झाला असून सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. सिराज ऑस्ट्रेलियात असताना शुक्रवारी त्याचे वडील मोहम्मद घौस यांचे भारतात निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. सिडनी येथे सराव करत असताना सिराजला वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. मात्र, क्वारंटाईनच्या नियमांमुळे सिराजने मायदेशात न परतण्याचा निर्णय घेतला आहे.

माझी केवळ एकच इच्छा आहे की, ‘माझा मुलगा देशाचे नावं मोठे करेल’, असे माझे वडील नेहमी म्हणायचे. मी त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण करणार आहे. माझे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून माझ्या वडिलांनी खूप कष्ट केले होते. त्यांनी रिक्षा चालवली. त्यांना गमावणे हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे. मी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार गमावला. प्रशिक्षक रवी शास्त्री आणि विराट कोहली यांनी मला वडिलांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी मला धीर दिला आणि आम्ही तुझ्या सोबत आहोत असेही सांगितले, असे सिराज एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना म्हणाला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -