IPL 2020 : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सपुढे असणार जेतेपद राखण्याचं आव्हान

mumbai indians

कोरोनाचा सावटात १९ सप्टेंबरपासून IPL च्या १३ व्या मोसमाला सुरुवात होत आहे. यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सपुढे जेतेपद राखण्याचं आव्हान असणार आहे. गतवर्षी अंतिम सामन्यात चेन्नईला धुळ चारत चौथ्यांदा IPLचे जेतेपद जिंकलं. मुंबईने २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ असं चारवेळा IPLचं चार वेळा जेतेपद जिंकलं आहे. मात्र, यावर्षी मुंबई इंडियन्स समोर जेतेपदाचं आव्हान असणार आहे.

मुंबई इंडियन्सची फलंदाजी नेहमीप्रमाणे मजबूत आहे. मात्र, लसिथ मलिंगा तसंच स्पिनर्सच्या कमतरतेमुळे जेतेपद जिंकण्याचं आव्हान असणार आहे. मुंबईचे आठ सामने अबू धाबीच्या धीम्या खेळपट्ट्यांवर होणार आहे. त्यामुळे अनुभवी स्पिनर्सची उणीव भासणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, आणि क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या यांच्यावर फलंदाजी मदार असणार आहे. मुंबईची भिडत १९ सप्टेंबरला चेन्नई सोबत होणार आहे. इतर संघांच्या तुलनेत मुंबईचं पारडं जड आहे. कारण मुंबईमध्ये मोठे फटके मारणारे खेळाडू आहेत.

मलिंगाची उणीव भासणार

गत वर्षी अंतिम लढतीत मुंबईला शेवटच्या षटकात विजय मिळवून देणारा लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणांमुळे यंदा स्पर्धेतून माघार घेतली आहे. मलिंगाची उणीव मुंबईला नक्की भासेल. मात्र मुंबईकडे जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट सारखे वेगवान गोलंदाज आहेत. यांच्या साथीला मिचेल मॅकलॅघेन देखील आहे. यासोबत अनुभवी किरोन पोलार्ड, अष्टपैलू हार्दिक पांड्या, फिरकीपटू कृणाल पांड्या आणि राहुल चहर अशी गोलंदाजांची फळी आहे.

मुंबईचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), दिग्विजय देशमुख, क्विंटन डि कॉक, आदित्य तारे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, नाथन कोल्टर-नाइल, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, किरोन पोलार्ड, लसिथ मलिंगा, राहुल चाहर, क्रिस लिन, हार्दिक पांड्या, शेरफेन रदरफोर्ड, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, मिचेल मॅकक्लिंघन, प्रिंस बलवंत राय सिंह, अनुकूल राय, इशान किशन.