घरक्रीडाजम्मू आणि काश्मीरच्या बॉलरचा पराक्रम; लागोपाठ ४ LBW

जम्मू आणि काश्मीरच्या बॉलरचा पराक्रम; लागोपाठ ४ LBW

Subscribe

जम्मू आणि काश्मीरचा बॉलर मोहम्मद मुधासीरने या रणजी मोसमाच्या पहिली हॅट्रिक घेतली आहे.

जम्मू आणि काश्मीरचा बॉलर मोहम्मद मुधासीरने रणजी चषकात नवा पराक्रम केला आहे. त्याने राजस्थानच्या संघाविरुद्ध चार बॉलमध्ये चार विकेट घेतल्या. त्यातही खास गोष्ट म्हणजे त्याने चारही विकेट घेताना बॅट्समनना एलबीडब्लू बाद केले. ही रणजी चषकाच्या नव्या मोसमाच्या पहिली हॅट्रिक आहे.

फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये नवा विक्रम 

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुधासीरने त्यांच्या ९८ व्या ओव्हरमध्ये आपली जादू दाखवली. त्याने या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर चेतन बिश्तला १५९ धावांवर बाद केले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्याने तेजिंदर सिंगला बाद केले. तर पुढच्या चेंडूवर त्याने राहुल चहारला बाद करत आपली हॅट्रिक पूर्ण केली. त्यानंतर सलग चौथ्या बॉलवर त्याने टी.उल-हकला बाद केले. या चौघांनाही त्याने एलबीडब्लू करून बाद केले. फर्स्टक्लास क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या बॉलरने सलग चार बॉलवर चार बॅट्समनना एलबीडब्लू बाद करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -