घरक्रीडासाई स्पोर्ट्स, बाल विकास मित्र मंडळ उपांत्य फेरीत

साई स्पोर्ट्स, बाल विकास मित्र मंडळ उपांत्य फेरीत

Subscribe

मुंबई शहर निवड चाचणी कबड्डी

श्री साई स्पोर्ट्स क्लब, बाल विकास या संघांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पुरुष तृतीय श्रेणी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. नायगाव येथील भारतीय क्रीडा मंडळाच्या पटांगणात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात श्री साई स्पोर्ट्सने दादोजी कोंडदेव मंडळावर ३३-२३ अशी मात केली. या सामन्याच्या मध्यंतराला १६-१५ अशी अवघ्या एका गुणाची आघाडी घेणार्‍या श्री साईने उत्तरार्धात दमदार खेळ करत विजय मिळवला. त्यांच्याकडून संदेश पाटील, लोचन वरळीकर यांच्या अप्रतिम खेळ केला. दादोजी कोंडदेवच्या अमर कदम, अनिकेत जाधव यांनी चांगली झुंज दिली, पण त्यांना आपल्या संघाचा पराभव टाळता आला नाही.

दुसर्‍या सामन्यात बाल विकास मित्र मंडळाने आंबेवाडी क्रीडा मंडळाचा ३३-०९ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. नितेश सणस, गणेश चव्हाण यांच्या अप्रतिम आक्रमण करत आंबेवाडीला विजय मिळवून दिला. आंबेवाडीकडून धनंजय निजामपूरकरने चांगला खेळ केला. त्याआधी झालेल्या चौथ्या फेरीच्या सामन्यात श्री साई स्पोर्ट्सने सूर्यकांत व्यायाम शाळेला २७-१५ असे नमवले होते. तसेच दादोजी कोंडदेवने बाल शिवाजीला ३६-३४ असे, आंबेवाडीने लालबाग स्पोर्ट्सला ३४-२४ असे, बाल विकासने नवनाथला २६-२३ असे, यश मंडळाने श्री विजय हनुमानाला ३३-२२ असे पराभूत करत आगेकूच केली होती.

- Advertisement -

शिवनेरीची विजयी सुरुवात

मंगळवारपासून सुरू झालेल्या पुरुष व्दितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेत श्री साई, भावकोमाता, शिवनेरी स्पोर्ट्स या संघांनी विजयी सलामी दिली. पहिल्या फेरीच्या सामन्यात श्री साई क्रीडा मंडळाने जय खापरेश्वरचा ३२- ३० असा पराभव केला. त्यांच्याकडून अथर्व मांडवकर, विकास घरत यांनी उत्तम खेळ केला. भावकोमाताने ओम् विद्यार्थीला ३१-२३ असे नमवले. शिवनेरी स्पोर्ट्सने सूर्यकांत स्पोर्ट्सवर ३६-२५ अशी मात केली. ओमकार, रोहित आवळे यांनी शिवनेरीकडून चांगला खेळ केला. तसेच महागाव तरुण सेवा मंडळ, कासारवाडी वेल्फेअर सेंटर, प्रभादेवी स्पोर्ट्स या संघांनाही विजय मिळवण्यात यश आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -