प्रफुल, काजलला जेतेपद

मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

Mumbai

आयकरच्या प्रफुल मोरेने पुरुषांमध्ये, तर इंडियन ऑईलच्या काजल कुमारीने महिलांमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि इंडियन ऑइल पुरस्कृत सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेचे जेतेपद पटकावले. पुरुष वयस्कर गटात सलग दुसर्‍यांदा युनाइटेड इंडिया इन्शुरन्सचा रवींद्र बच्चलवार विजेता ठरला. त्याने अंतिम सामन्यात विजय कॅरम क्लबच्या संजय कांबळेवर १२-२१, २५-१, २३-१२ अशी मात केली. शिवतारा कॅरम क्लबने आंतर क्लब सांघिक गटाचे जेतेपद मिळवले.

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रफुल मोरेने मुंबई महानगरपालिकेच्या गिरीश तांबेला १९-१६, २४-१७ असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले. त्याआधी झालेल्या उपांत्य फेरीत प्रफुलने फ्रान्सिस फर्नांडिसवर आणि गिरीश तांबेने संदीप देवरूखकरवर विजय मिळवला होता.

महिलांच्या अंतिम सामन्यात अनुभवी काजल कुमारीने जैन इरिगेशनच्या निलम घोडकेचा २५-३, २०-१४ असा पराभव करून या गटाचे जेतेपद मिळवले. त्याआधी काजलने रिझर्व्ह बँकेच्या संगीता चांदोरकरवर, तर निलमने रिझर्व्ह बँकेच्याच उर्मिला शेंडगेवार मात करत अंतिम फेरी गाठली होती.सांघिक गटात शिवतारा विजयी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here