घरक्रीडास्टर्लिंग-बालबर्नीची झंझावाती शतके; तिसऱ्या वनडेत आयर्लंडची इंग्लंडवर मात

स्टर्लिंग-बालबर्नीची झंझावाती शतके; तिसऱ्या वनडेत आयर्लंडची इंग्लंडवर मात

Subscribe

वनडेत धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा हा सर्वात मोठा विजय ठरला.

पॉल स्टर्लिंग आणि कर्णधार अँडी बालबर्नी यांनी केलेल्या शतकांच्या जोरावर आयर्लंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्वविजेत्या इंग्लंडवर सात विकेट राखून मात केली. सामना जिंकण्यासाठी इंग्लंडने ठेवलेले ३२९ धावांचे लक्ष्य आयर्लंडने एक चेंडू शिल्लक असताना गाठले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा हा सर्वात मोठा विजय ठरला. याआधी २०११ विश्वचषकात त्यांनी इंग्लंडविरुद्धच ३२८ धावांचा यशस्वीरीत्या पाठलाग केला होता. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतरही आयर्लंडने तीन सामन्यांची ही मालिका १-२ अशी गमावली.

कर्णधार मॉर्गनचे शतक

या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची सुरुवातीला ३ बाद ४४ अशी अवस्था होती. मात्र, कर्णधार इयॉन मॉर्गन आणि टॉम बँटनने इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी रचली, ज्यात मॉर्गनचा ८४ चेंडूत १०६ धावांचा वाटा होता. तो बाद झाल्यावर बँटन (५८), डेविड विली (५१) आणि टॉम करन (नाबाद ३८) यांनी केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळे इंग्लंडने ३२८ धावा केल्या.

- Advertisement -

२१४ धावांची भागीदारी

याचा पाठलाग करताना पॉल स्टर्लिंग आणि गॅरेथ डीलेनी यांनी आयर्लंडच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. डीलेनी (१२) बाद झाल्यावर स्टर्लिंग आणि बालबर्नी यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २१४ धावांची भागीदारी केली. अखेर करनने स्टर्लिंगला धावचीत केले. स्टर्लिंगने १२८ चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकारांसह १४२ धावांची खेळी केली. बालबर्नी ११२ चेंडूत १२ चौकारांसह ११३ धावा करून बाद झाला. परंतु, हॅरी टेक्टर (नाबाद २९) आणि केविन ओब्रायन (नाबाद २१) यांनी आक्रमक फलंदाजी करत आयर्लंडला विजय मिळवून दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -