घरक्रीडाशेन वार्नने मोहम्मद कैफला 'अहंकारी' म्हटले

शेन वार्नने मोहम्मद कैफला ‘अहंकारी’ म्हटले

Subscribe

आयपीएलच्या पहिल्या सत्रात शेन वार्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल जिंकले होते. त्यावेळी मोहम्मद कैफ आणि वार्न एकाच संघात खेळत होते.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू शेन वार्न याने ‘नो स्पिन’ नावाचे स्वत:चे आत्मचरित्र लिहिले आहे. या आत्मचरित्रात त्याने क्रिकेट जगतातील आपल्या कडूगोड आठवणींना उजाळा दिला आहे. या पुस्तकात त्याने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्या सत्रातील आठवणींविषयी लिहिले आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रात वार्न राजस्थान रॉयल संघाचा कर्णधार होता. वार्नच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल जिंकले होते. वार्नने आपल्या आत्मचरित्रात भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मोहम्मद कैफ अहंकारी म्हटले आहे.

नेमकं काय लिहिले आहे आत्मचरित्रात?

शेन वार्नने मोहम्मद कैफ संबंधीत एक किस्सा आपल्या आत्मचरित्रात लिहिला आहे. त्यामध्ये त्याने लिहिले आहे की, राजस्थान रॉयलची टीम एका हॉटेलमध्ये पोहोचली होती. तिथे सर्व खेळाडूंना आपापल्या रुमची चावी देण्यात आली. प्रत्येकाला एक खोलीचा रुम देण्यात आला होता. प्रत्येक खेळाडू आपापल्या रुमची चावी घेऊन निघून गेले. मी रिसेप्शनच्या इथे टीमच्या मालकांसोबत बोलत होतो. तेव्हा रिसेप्शनच्या इथे मोहम्मद कैफ आला. तिथे त्याने रिसेप्शनिस्टला सांगितले, ‘मी मोहम्मद कैफ आहे’. यावर रिसेप्शनिस्टने सांगितले, ‘हो, मी आपली काय मदत करु शकतो?’ कैफने परत उत्तर दिले की, ‘मी कैफ आहे’. यानंतर वार्न तिथे गेला आणि त्याने त्याला सांगितले की, ‘मला वाटतं त्यांना माहित आहे तुम्ही कोण आहात ते? आणि तुम्हाला काय हवे आहे?’ यावर कैफने उत्तर दिले, ‘प्रत्येक खेळाडूप्रमाणे मलाही लहान खोली मिळाली आहे’. यावर वार्न म्हणाला की, ‘तुम्हाला खोली हवी आहे की दूसरं काही?’ यावर कैफ परत म्हणाला की, ‘मी कैफ आहे. मी सिनियर खेळाडू आहे. एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. त्यामुळे मला मोठी खोली हवी आहे’. यापुढे वार्न म्हणतो की, ‘प्रत्येकाला एकच खोली असलेला रुम देण्यात आला आहे. फक्त मलाच जास्त खोली असलेला रुम मिळाला आहे. कारण मला अनेक लोकांना भेटावे लागते’. यापुढे तो लिहितो की सिनियर भारतीय खेळाडू जास्त सुविधा मिळण्याची अपेक्षा करतात. त्यामुळे सगळ्यांच्या सन्मानासाठी मला एकसारखे नियम बनवावे लागतील, हे समजले होते.

- Advertisement -

हेही वाचा – भारताच्या महिला क्रिकेटर्सचा T-20 वर्ल्डकपआधी जोरदार भांगडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -