घरक्रीडावर्ल्ड कप संघात अजून एक वेगवान गोलंदाज हवा होता!

वर्ल्ड कप संघात अजून एक वेगवान गोलंदाज हवा होता!

Subscribe

गौतम गंभीरचे स्पष्ट मत

इंग्लंडमध्ये होणारा आगामी विश्वचषक जिंकण्याचे भारतीय संघाला प्रमुख दावेदार मानले जात आहे. भारताचा संघ हा या विश्वचषकातील सर्वात संतुलित संघ आहे, असे अनेकांचे मत आहे. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर त्यापैकी एक नाही. त्याच्या मते विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघात अजून एक वेगवान गोलंदाज असायला हवा होता.
माझ्या मते भारतीय संघात अजून एक दर्जेदार वेगवान गोलंदाज असायला हवा होता. (जसप्रीत) बुमराह, (मोहम्मद) शमी आणि भुवनेश्वर (कुमार) यांना मदतीची गरज पडेल. वेगवान गोलंदाजी करू शकणारे अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि विजय शंकर या संघात असल्याने आणखी वेगवान गोलंदाजांची गरज नाही, असे काहींना वाटू शकते. मात्र, मला ते चांगले प्रदर्शन करतीलच याची खात्री नाही. शेवटी तुम्हाला जो सर्वोत्तम संघ वाटतो, तो निवडून, सर्व खेळाडूंना पाठिंबा दर्शवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते, असे गंभीरने सांगितले.

तसेच ३० मेपासून सुरु होणार्‍या विश्वचषकाविषयी तो म्हणाला, या स्पर्धेत प्रत्येक संघ सर्व संघांशी सामने खेळणार आहे, त्यामुळे हा विश्वचषक खूपच रंगतदार होणार आहे. या विश्वचषकात फक्त सर्वोत्तम १० संघच खेळणार असल्याने ही स्पर्धा जिंकणारा संघ खरा विश्वविजेता असेल, असे म्हणता येईल. माझ्या मते यापुढेही आयसीसीने अशाच प्रकारचा विश्वचषक खेळवला पाहिजे. हा विश्वचषक कोण जिंकू शकेल असे विचारले असता गंभीरने सांगितले, भारतीय संघ हा विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार आहे. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियावरही इतर संघानी नजर ठेवणे गरजेचे आहे. माझ्या मते त्यांच्याकडे सर्वोत्तम गोलंदाज आहेत. तसेच न्यूझीलंड आणि यजमान इंग्लंड यांच्यातही हा विश्वचषक जिंकण्याची क्षमता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -