घरक्रीडाभारतीय संघावर हल्ल्याची धमकी

भारतीय संघावर हल्ल्याची धमकी

Subscribe

भारतीय क्रिकेट संघावर हल्ला करण्यात येईल, अशा धमकीचा मेल पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) काही दिवसांपूर्वी मिळाला. पीसीबीने हा मेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) पाठवला, ज्यांनी पुढील २४ तासांत याची प्रत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पाठवली.

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौर्‍यावर गेला असून खेळाडू सध्या अँटिग्वा (जिथे पहिला कसोटी सामना होणार आहे) येथे राहत आहेत. त्यामुळे बीसीसीआयने या धमकीबाबतची माहिती केंद्रीय गृह मंत्रालय आणि अँटिग्वामधील भारतीय दूतावासाला दिली. तसेच भारतीय संघाला वेस्ट इंडिजमध्ये कोणताही धोका नाही आणि भारतीय संघाच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घेतली जात आहे, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले.

- Advertisement -

धमकीचा मेल थेट बीसीसीआयला न पाठवता पीसीबीला पाठवण्यात आला. हल्ल्याची धमकी देणार्‍या दहशतवादी गटाच्या नावाचा मेलमध्ये उल्लेख नाही. त्यामुळे ही धमकी खोटी असल्याचे वाटते, असे हा मेल वाचलेला एक अधिकारी म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -