घरक्रीडाबायर्न म्युनिकची चेल्सीवर मात

बायर्न म्युनिकची चेल्सीवर मात

Subscribe

युएफा चॅम्पियन्स लीग

सर्ज गनाब्रीने केलेल्या दोन गोलच्या जोरावर बायर्न म्युनिकने युएफा चॅम्पियन्स लीगच्या उप-उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या लेगमध्ये चेल्सीवर ३-० अशी मात केली. चॅम्पियन्स लीगमध्ये घरच्या मैदानावर चेल्सीचा हा (गोलच्या बाबतीत) सर्वात मोठा पराभव होता. मध्यंतराला या सामन्यात गोलशून्य बरोबरी होती, पण उत्तरार्धात बायर्नने उत्कृष्ट खेळ करत ३ गोल केले.

या सामन्याच्या सुरुवातीपासूनच बायर्नने आक्रमक खेळ करत चेल्सीवर दबाव टाकला. त्यांचा अनुभवी खेळाडू थॉमस मुलरला गोल करण्याच्या दोन संधी मिळाल्या. मात्र, त्याला संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. तसेच त्याने मारलेला हेडर गोलपोस्टला लागला. त्यामुळे मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती.

- Advertisement -

अखेर ५१ व्या मिनिटाला रॉबर्ट लेव्हेंडॉस्कीच्या अप्रतिम पासवर गनाब्रीने गोल करत बायर्नला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानेच तीन मिनिटांनंतर बायर्नची आघाडी दुप्पट केली. ७६ व्या मिनिटाला लेव्हेंडॉस्कीने केलेल्या गोलमुळे बायर्नला ३-० अशी आघाडी मिळाली. ८३ व्या मिनिटाला मार्कोस अलोन्सोला रेड कार्ड मिळाल्याने चेल्सीला उर्वरित सामन्यात १० खेळाडूंनिशी खेळावे लागले. त्यांना पुढेही गोल करता आला नाही आणि बायर्नने सामना ३-० असा जिंकला.

नॅपोली-बार्सिलोना सामन्यात बरोबरी

नॅपोली आणि बार्सिलोना यांच्यातील उप-उपांत्यपूर्व फेरीचा पहिला लेग १-१ असा बरोबरीत संपला. हा सामना नॅपोलीच्या घरच्या मैदानावर झाला. यात ३० व्या मिनिटाला ड्रिस मार्टेन्सने गोल करत नॅपोलीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बार्सिलोनाने चांगले पुनरागमन केले. ५७ व्या मिनिटाला अँटोन ग्रीझमनने केलेल्या गोलमुळे सामन्यात १-१ अशी बरोबरी झाली. या सामन्याचा दुसरा लेग १९ मार्चला होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -