Amazon आणि Flipkart वर ऑफर्सचा पाऊस; कोणत्या फोनवर किती मिळणार सूट, पाहा यादी

get lots of offers on smartphones in Amazon great Indian Festival and Flipkart Big Billion Days

ई-कॉमर्स कंपनी Amazon आणि Flipkart वर नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सेलची सुरुवात होणार आहे. Amazon great Indian Festival आणि बिग बिलियन डेजच्या (Flipkart Big Billion Days) सेलला सुरुवात होण्यापूर्वीच सेलमध्ये कोणत्या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळेल याची यादी जाहीर केली आहे. सेलमध्ये मोबाईल्सवर ऑफर्सचा वर्षाव होणार आहे. Amazon great Indian Festival सेल १७ ऑक्टोबरपासून पाच दिवस असणार आहे. तर फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज २०२० सेल हा १६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. ने

या फोन्सवर ऑफर्सचा पाऊस

OnePlus 8

Amazon great Indian Festival मध्ये OnePlus 8 च्या मॉडेलवर ५,००० रुपयांहून अधिक सूट मिळणार आहे. 6GB+128 GB मॉडेलच्या किमती या ४१,९९९ पासून ३९,९९९ पर्यंत असणार आहेत. 12GB+256GB चे मॉडेल ४४,९९९ पर्यंत मिळणार आहेत.

Samsung Galaxy S10

Amazon सेलच्या दिवशी Samsung Galaxy S10 वर ग्राहकांना ३४,००० रूपयांची सूट मिळणार आहे. ४४,९९९ रूपयांपर्यंत हा फोन ९ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट EMI वर घेऊ शकतात.

iPhone 11

Amazon great Indian Festival मध्ये ६८,००० रूपये किंमतीचा आयफोन ग्राहकांना ५०,००० रुपयांपर्यंत मिळणार आहे. iPhone 11 मध्ये 128 GB ऑनबोर्ड स्टोरेजसह A13 बायोनिक SoC आहे. तसेच यात ड्युअल कॅमेरा 12MP फ्रंट कॅमेरा आणि 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे.

Redmi 9 prime

शाओमीचा नवीन रेडमी ९ प्राईम ११,९९९ ऐवजी ९,९९९ रूपयांना मिळणार आहे. ग्राहक क्रेडिट कार्ड खरेदीच्या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. या फोनला 6.53 इंचाचा फुल एचडी (1,080×2,340pixel) डिस्प्ले आणि रीअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 13MP कॅमेरा अणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे.

MI 10

फ्लिपकार्टवर नवीन शाओमी MI 10 फोन ५९,९९९ ऐवजी ४९,९९९ रूपयांत देणार आहेत. या फोनमध्ये 108MP कॅमेरा आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 SoC आहे. ही ऑफर फक्त फ्लिपकार्टवर ५ टक्के मर्यादित क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे.

Realme X3

रिअलमीचा Realme X3 फोन कमीत कमी २१,९९९ रुपयांना मिळणार आहे. तसंच 6GB चं मॉडेल २४,९९९ ला तर 8GB चं मॉडेल २५,९९९ ला मिळणार आहे. रिअलमी X3 या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा आणि क्वाड कॅमेरा आहे तसंच या फोनमध्ये 6.57 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855SoC आहे.


हेही वाचा – IPL 2020: कोहली, एबी यांच्यावर बंदी घालण्याची के.एल. राहुलची मागणी