Video: मांजरीने वाचवला चिमुरड्याचा जीव!

Mumbai
colombia viral video cat saves 1 year old baby from falling down the stairs

अमेरिकेतील कोलंबियामध्ये एका मांजरीने एक वर्षाच्या चिमुरड्याचा प्राण वाचवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मांजरीने त्या चिमुरड्याला पायऱ्यावरून पडण्यापासून वाचवले आहे. सोशल मीडियामुळे हा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये तो चिमुरड्या रांगताना दिसत आहे. तर मांजर ही पलंगावर बसलेली दिसत आहे. जेव्हा तो चिमुरडा रांगत रांगत पायऱ्यांच्या इथे गेला तेव्हा मांजरीने पटकन उडी मारली आणि मुलाला त्या पायऱ्यांपासून दूर ढकलून दिले. जर वेळीचं मांजर आली नसती तर तो चिमुरडा पायऱ्यांवरून पडला असता.

Amazing Cat Saves Baby From Falling Down Stairs

Cat saves a child who is about to fall down the stairs.

Anonymous ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ನವೆಂಬರ್ 6, 2019

हा व्हिडिओची डिलॉरे अल्व्हरेझ नावाच्या फेसबुक पेजने शेअर केला आहे. मांजरींना वाचवण्यासाठी आणि दत्तक घेण्यासाठी असलेली ही संस्था आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून बऱ्याचं जणांनी हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे.

या मांजरीचे नेटकरी खूप कौतुक करत आहेत. नेटकऱ्यांनी अशाप्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत.