पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ पोस्टवर भाजपचा खुलासा

Mumbai

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून भाजप हे नाव काढून टाकल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणारा का?, अशा चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या.यावर भाजपचे नेता चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या अफवा असल्याचे म्हटले आहे. पंकजा मुंडे कालही भाजपमध्ये होत्या, आजही आहेत आणि उद्याही राहणार, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.