सरकार पडण्याच्या अफवा; मविआतून फुटणारे आमदार राजकारणातील उठतील

सरकार पडणार अशी अफवा अधुनमधुन राज्यात उठवली जाते. या अफवेमागे स्वतःचे महत्त्व वाढविण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच जर महाविकास आघाडीमधून आमदार फुटले तर पुन्हा त्यांना निवडणूक जिंकणे कठीण जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सत्तेतून फुटणाऱ्या आमदारांना राजकारणातूनच बाद व्हावे लागेल, असेही ते म्हणाले.