घरCORONA UPDATECorona Vaccine : ऑक्सफोर्डच्या लसीचा त्या महिलेवर असा झाला दुष्परिणाम

Corona Vaccine : ऑक्सफोर्डच्या लसीचा त्या महिलेवर असा झाला दुष्परिणाम

Subscribe

संपूर्ण जगाला कोरोना विषाणूवरील लसीबाबत उत्सुकता आहे. जगात अजूनही कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून त्यावरील लस कधी येणार याचीच सगळे वाट पाहत आहेत. अशातच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने या लसीच्या चाचण्यांवर निर्बंध आणले असून लोकांची निराशा केली आहे. या लसीच्या चाचणीवेळी एका रुग्णावर याचा प्रयोग केला असता त्याचे दुष्परिणाम आढळून आल्याने ही चाचणी थांबवण्यात आली असल्याचे समजते. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेका एकत्रितरित्या कोरोना विषाणूवरील लस बनवत आहेत.

एस्ट्राजेनेका यांच्यावतीने असे सांगण्यात आले आहे की, लसीच्या चाचणीत युकेतील एका महिलेला कंबरेच्या हाडाला मोठी सूज आली. असे क्वचितच घडते. त्यामुळे कंपनीच्यावतीने याचे प्रयोग थांबवण्यात यावा हा निर्णय घेण्यात आला. एस्ट्राजेनेकाचे प्रमुख एग्जीक्यूटिव्ह यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली की, त्या महिला रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. ही एक साधारण बाब असून कोणत्याही औषधांचे दुष्परिणाम आढळल्याचे त्याचे प्रयोग थांबवले जातात. त्यातील त्रुटी शोधल्या जातात. तसेच यानंतर पूर्ण काळजीपूर्वक लसीचे परिक्षण करून पुन्हा त्याच्या चाचण्या केल्या जातील, असे एस्ट्राजेनेका यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीवर या लसीचे याचे साइड इफेक्ट दिसल्यानंतर त्याची चाचणी काही वेळासाठी थांबवण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने निवेदन जारी करत ‘कोणत्याही परिस्थितीत लसीच्या सुरक्षिततेबाबत कोणताही करार होऊ नये, असे म्हटले होते.

हेही वाचा –

‘फडणवीस ड्राय क्लिनर, आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे’; खडसेंचा पुन्हा टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -