घरमुंबईमुंबई महापालिका हॉस्पिटल्समधील औषध पुरवठा आजपासून बंद

मुंबई महापालिका हॉस्पिटल्समधील औषध पुरवठा आजपासून बंद

Subscribe

मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या औषध तुटवड्याप्रकरणी पालिकेने मंगळवारी अजून एका औषध पुरवठादार कंपनीला वेळेवर औषधं पुरवठा न केल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकलं. याच्याच निषेधार्थ औषध पुरवठादार संघटनांनी बुधवारपासून पालिका हॉस्पिटल्समध्ये औषध पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या औषध तुटवड्याप्रकरणी पालिकेने मंगळवारी अजून एका औषध पुरवठादार कंपनीला वेळेवर औषधं पुरवठा न केल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकलं. याच्याच निषेधार्थ औषध पुरवठादार संघटनांनी बुधवारपासून पालिका हॉस्पिटल्समध्ये औषध पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा पालिका हॉस्पिटल्समध्ये औषधांचा पुरेसा साठा ठेवला जातो. पण, आता फक्त काही दिवस पुरेल एवढाच साठा सध्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे पालिका हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या गरीब रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे.

ऑल इंडिया फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर फाऊंडेशनने पालिकेनेही केलेली कारवाई चुकीची असल्याचं म्हणत निषेध व्यक्त केला आहे.

- Advertisement -

कागदपत्रे न देणे, खोटी कागदपत्र देणे, औषध पुरवठा बंद करणे किंवा निकृष्ट दर्जाची औषधं देणे या कारणांमुळे काळ्या यादीत टाकलं जाईल, असे पालिकेने कंपन्यांशी केलेल्या करारामध्ये नमूद केले आहे. कामात दिरंगाई आढळल्यास पालिकेने प्रथम दंडवसूली करावी, अशी तरतूद आहे. या कंपनीने दंड ही भरला आहे. तरीही या कंपनीला काळ्या यादीत टाकलं आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीणकुमार परदेशी यांच्याच सांगण्यानुसार आम्ही हा निर्णय घेतला आहे. 

– अभय पांडे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर फाऊंडेशन

- Advertisement -

कंपनीने उशिरा औषधे दिल्याप्रकरणी १३ ते १४ लाख दंड भरला आहे. पालिकेने पहिली कारवाई डेफोडिल या औषध पुरवठा कंपनीवर केली. या कंपनीने सर्वाधिक म्हणजे ३९४ वेळा वेळेत औषध पुरवठा केलेला नाही. अशा एकूण औषध पुरवठादारांसोबत दोषी असलेल्या हॉस्पिटलमधील जवळपास २०० अधिकाऱ्यांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस पाठवली असून यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

वेळेत औषध पुरवठा न करणाऱ्या एजून २५ कंपन्यांना पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यातील व्हिनस रेमिडिज लिमिटेड (लाइफ लाइन फार्मा) या कंपनीला काळ्या यादीत टाकलं आहे. या कंपनीने १५ वेळा औषध पुरवठा केलेला नाही. 

केईएममध्ये पुढचे १५ दिवस पुरेल एवढा औषधांचा साठा आहे. दररोज कोणती औषधं नाहीत याची विचारपूस केली जाते. आता पावसाळा सुरू होण्याच्या दृष्टीकोनातून दोन महिन्यांपूर्वीच पुढच्या तीन‌ महिन्यांच्या औषधांची मागणी केली आहे.

– डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता , केईएम हॉस्पिटल

पालिकेच्या प्रमुख ४ हॉस्पिटलसह, १६ उपनगरीय आणि ५ विशेष हॉस्पिटल्स, १७५ दवाखाने आणि २८ प्रसूतीगृह कार्यरत आहेत. यामधील औषध तुटवड्याचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाने एक चौकशी समिती स्थापन केली गेली. या समितीच्या अहवालानुसार, २०१८ या वर्षभरात ३८ हून अधिक औषध पुरवठादार कंपन्यानी औषधं मागितल्यानंतर ३७ दिवसांच्या आत औषध पुरवठा केला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात औषधांचा तुटवडा जाणवला. दरम्यान, संध्याकाळी अतिरिक्त आयुक्त आश्विनी जोशी यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर औषध वितरकांनी औषधं पुन्हा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -