घरलाईफस्टाईलतांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने 'हे' फायदे होतात...

तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने ‘हे’ फायदे होतात…

Subscribe

आपल्या आरोग्यामध्ये पाणी हा अविभाज्य घटक आहे. ३ ते ४ लीटर पाणी दिवसभरातून आपल्या शरीरात जाणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याला अनेकदा डॉक्टर देखील पाणी पिण्याचा सल्ला देतात. सकाळी उठल्यानंतर तांब्याच्या भांड्यातले पाणी प्यायल्यास शरीराला ते फायदेशीर असते. जीवशैलीत बदल झाल्यामुळे पारंपारिक वस्तूंची जागा ही पाश्र्चात्य संस्कृतीने घेतली आहे.

तरी देखील आपण आज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने काय फायदा होतो हे जाणून घेणार आहोत. तांब्याच्या भांड्यात नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी दुषित होत नाही. तसेच या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत कारण त्यामुळे कफाची समस्या दूर होते. किमान ८ तास तांब्याच्या भांड्यातील ठेवलेले पाणी नियमित प्यावे.

तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे फायदे

१) चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होणे –  तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट असते. तसेच त्या पाण्यात नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता असल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर नवीन त्वचा निर्माण करण्यास मदत करते.
२) कर्करोगाशी सामना करणे – कर्करोग जडण्याचे प्रमुख कारण हे शरिरातील फ्री-रॅडिकल्स असते. त्यामुळे शरिरातील फ्री-रॅडिकल्सशी सामना करण्यासाठी तांब्याच्या अॅन्टीऑक्सिडंट घटक मदत करते.
३) सांधेदुखी दूर होणे – तांब्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने हाडं मजबुतीसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदा होतो. तांब्यात दाह दूर करण्याची क्षमता असते. त्यामुळे सांधीदुखी दूर होण्यास मदत होते.
४) पचनसंस्थेला चालना मिळणे – ज्यांना पित, पोटात गॅस किंवा अल्सर असतो त्यांना तांब्याच्या भांडीत पाणी हे खूप हितकारक असते. तांब्यात जंतूनाशक गुणधर्मामुळे पोटातील जिवाणूंचा नाश होतो. तसेच या पाण्यामुळे पचनक्रियेचा मार्ग स्वच्छ होतो.
५) जखम भरून काढण्यास मदत करते – तांब्यामुळे शरीराच्या आतील जखमा विशेषतः पोटातील जखमा लबकर भरण्यास मदत होते. या पाण्यात अॅन्टीबॅक्टेरीयल आणि अॅन्टावायरल असल्याने दाह कमी होण्यास मदत होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -