घरमहा @२८८परांडा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २४३

परांडा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २४३

Subscribe

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा (विधानसभा क्र. २४३) विधानसभा मतदारसंघ आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा हा क्रमांक २४३ वा विधानसभा मतदारसंघ आहे. परंडा मतदारसंघावर राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्राबल्य आहे. या मतदारसंघातून कै. महारुद्र मोटे दोन वेळेस सलग आमदार होते. त्यांच्यानंतर शिवसेनेकडून ज्ञानेश्वर पाटील सलग दोन वेळेस आमदार झाले. कोणताही नेता सलग दोन वेळेपेक्षा अधिक काळ आमदार होत नाही, असा या मतदारसंघाचा अनुभव होता. मात्र विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे यांनी २००४, २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत विजय मिळवून हॅटट्रीक करून इतिहास घडवला. मोदी लाटेतही त्यांनी गड राखला , मोटे परिवारात पाच वेळेस आमदारकी आहे. २०१४ च्या निवडणुकीत राहुल मोटे ७८ हजार ५४८ मते तर शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटील यांना ६६ हजार १५९ मते पडल्याने मोटे १२ हजार ३८९ मतांनी विजयी झाले.

मतदारसंघ क्रमांक – २४३

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,५८,४४७

महिला – १,३५,८०८

एकूण मतदार – २,९४,२५७

विद्यमान आमदार – राहुल मोटे, राष्ट्रवादी

राष्ट्रवादीकडून आमदार राहुल मोटे यांची उमेदवारी नक्की असून शिवसेनेकडून जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत निवडणूक लढवू शकतात. पालकमंत्री सावंत हे जरी विधानपरिषदेवर असले तरी त्यांचा जनतेतून विधानसभेवर जाण्यावर भर आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी असलेला मतदार संघ म्हणून परंड्याची ओळख आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे मतदार संघात त्यांच्या सोयीनुसार राजकीय उपयुक्त व उपद्रव मूल्य दाखवतात असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांची पडद्याआडची भूमिकाही महत्वाची आहे. भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यामुळे परंडा मतदार संघात अनेक ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज संस्थेत कमळ फुलले असून पक्ष बांधणी केली आहे. भाजपकडून संजय गाढवे उत्सुक असून रासपकडून बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर हेही प्रयत्नात आहेत. विरोधकांची मत विभाजन हे नेहमी आमदार मोटे यांना फायद्याचे ठरते.

rahul mote
आमदार राहुल मोटे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) राहुल मोटे, राष्ट्रवादी – ७८,५४८

२) ज्ञानेश्वर पाटील, शिवसेना – ६६,१५९

३) बाळासाहेब पाटील, रासप – ३७,३२४

४) निरुद्दीन चौधरी, काँग्रेस – ७,७६०

५) गणेश शेंडगे, मनसे – २,४२६

हेवाचा – ४० – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -