घरक्रीडावर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिपमध्ये पी. व्ही. सिंधूचा अंतिम फेरीत प्रवेश

वर्ल्ड बॅडमिंटन चँपियनशिपमध्ये पी. व्ही. सिंधूचा अंतिम फेरीत प्रवेश

Subscribe

पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या वर्ल्ड चँपियनशिपमध्ये सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

भारताची कुशल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपल्या कुशल कामगिरीच्या जोरावर बॅडमिंटनच्या वर्ल्ड चँपियनशिपमध्ये सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने चीनच्या शेन युफेईचा २७-७, २१-१४ असा दोन सेटमध्ये पराभव केला. सिंधू आणि शेन युफेईमध्ये झालेला सामना अत्यंत रोचक ठरला. हा सामना दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा होता. या उपांत्य सामन्यानंतर आता सिंधू थेट अंतिम सामन्यचात शेवटचा सामना खेळणार आहे. आता रॅटचानोक इन्टानोन आणि नोझोमी ओखुरा यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळला जाणार आहे. या दोघांपैकी जो जिंकले तो अंतिम सामन्यात सिंधू सोबत लढणार आहे.

- Advertisement -

शुक्रवारी सिंधूचा ताइ यिंगसोबत सामना झाला होता. या सामन्यात सिंधूने १२-२१, २३-२१, २१-९ असा तीन सेटमध्ये पराभव करुन उपांत्या फेरीत आपली जागा निश्चित केली. त्यानंतर शनिवारी म्हणजे आज शेन युफेई विरोधात सिंधूनी सामना खेळला. या सामन्यात युफेईला सिंधूने सुरुवातीपासूनच संधी दिली नाही. अखेर २७-७, २१-१४ असा दोन सेटमध्ये सिंधूने युफेईचा पराभव केला. या विजयासहच सिंधूने अंतिम सामन्यात प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -