घरक्रीडामहाराष्ट्राच्या श्रीकांतचा इंग्लंडमध्ये विक्रम

महाराष्ट्राच्या श्रीकांतचा इंग्लंडमध्ये विक्रम

Subscribe

विदर्भाचा डावखुरा गोलंदाज श्रीकांत वाघने एकाच सामन्यात १० बळी घेत एका विक्रमाची नोंद केली आहे सध्या भारतीय क्रिकेटपटू इंग्लंड दौऱ्यावर आहेत.

आर्यंलडविरूद्ध सामन्यात भारतीय संघांने विक्रमी विजयाची नोंद केल्यानंतर आता इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये भारताच्या श्रीकांत वाघने एकाच मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या दहाही बॅट्समनना तंबूत धाडण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे श्रीकांतने हा विक्रम इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मिडेलब्रो या तगड्या संघाविरुद्ध नोंदवलाय.

श्रीकांत हा इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये स्टोक्सले क्लबकडून खेळतो. त्याने इंग्लिश प्रीमियर लीगच्या मिडेलब्रोविरूद्ध स्टोक्सले या मॅचमध्ये ११.४ षटकांत ३९ धावा देत तबब्ल १० विकेट घेतल्या आहेत. या सोबतच श्रीकांतने २८ चेंडूंत ४१ धावा करत सामन्यात अष्टपैलू कामगिरी पार पाडली. त्याच्या या अप्रतिम खेळीच्या जोरावर स्टोक्सलेने मिडेलब्रवर १३५ धावांनी विजय मिळवला. या भव्य विजयाचे श्रेय स्टोक्सले क्लबने श्रीकांतला देत आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्याचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

श्रीकांत हा मुळचा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रहिवासी असून तो २००९ आणि २०१० ला आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स टीमकडून खेळला असून २०११ ला तो पुणे वॉरियर्स संघाकडून खेळत होता. विशेष म्हणचे त्याने २००३-०४ अंडर १९ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतही अशाच एका विक्रमाची नोंद त्याने बांगलादेशविरुद्ध सामन्यात ९ विकेट्स घेत अप्रतिम खेळ दाखवला होता.

ShrikantWagh
श्रीकांत वाघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -