घरक्रीडाशालेय स्पर्धांमधील ४१ खेळ पुन्हा सुरू

शालेय स्पर्धांमधील ४१ खेळ पुन्हा सुरू

Subscribe

शालेय क्रीडा स्पर्धांमधील बंद झालेले ४१ खेळ पुन्हा सुरू करण्याची घोषणा क्रीडा दिनानिमित्त शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री अ‍ॅड. अशिष शेलार यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात आयोजित करण्यात आलेल्या ‘फिट इंडिया’ यातील एक कार्यक्रम पुणे येथे गुरुवारी झाला. या कार्यक्रमाला अ‍ॅड. अशिष शेलार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

एकजुटीने खेळ खेळल्याने समाजात, समूहात राहण्याचे संस्कार मुलांवर होतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खेळामुळे जोपासले जाते. या कारणांमुळे आता खेळांसाठी एक लोकचळवळ उभी करण्यास सुरुवात केली आहे. या चळवळीत सहभागी होताना, शालेय क्रीडा विभागात बंद करण्यात आलेले ४१ खेळ पुन्हा सुरू करण्यात येत आहेत, असे शेलार यांनी सांगितले. क्रीडा संचनालयातर्फे २०१७ साली ४१ खेळ बंद करण्यात आले होते.

- Advertisement -

खेळांची यादी –

बेल्ट रेसलिंग, फूटसाल, युनिफाईट, रस्सीखेच, थ्रो-बॉल, मिनी गोल्फ, वूडबॉल, रोलर स्केटिंग, कॉर्फ बॉल, पॉवर लिफ्टिन्ग, तिरंदाजी, थाय बॉक्सिंग, आष्टेडू आखाडा, फुटबॉल, सुपर सेव्हन क्रिकेट, लगोरी, टेनिस, टेबल सॉकर, कुराश, कुडो, हूप कॉर्न दो, बुडो मार्शल आर्ट, रोप स्किपींग, युग मुं दो, पेंट्याक्यू, सेपेक टकारा, वोवीनाम, लंगडी, सिलंबम, ग्रॅपलिंग, सॉफ्ट टेनिस, फ्लोअर बॉल, टेनिक्वाईट, जित कुने दो, टेनिस बॉल क्रिकेट, चॉक बॉल, टेनिस व्हॉलीबॉल, स्पिडबॉल, थांग ता मार्शल आर्ट, तेंग सू डो, ड्रॉप रो बॉल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -