घरमहाराष्ट्रअकरावीच्या सव्वा लाख जागा रिक्त

अकरावीच्या सव्वा लाख जागा रिक्त

Subscribe

फेरपरीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी 3 सप्टेंबरपासून नव्याने प्रवेश प्रक्रिया

अकरावी प्रवेशाच्या सर्व फेर्‍या पूर्ण झाल्यानंतर तब्बल 1 लाख 23 हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये कॉमर्सच्या सर्वाधिक 53 हजार 366 जागा असून, त्याखालोखाल सायन्सच्या 48 हजार 393 जागा आहेत. दरम्यान दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल 30 ऑगस्टला जाहीर होणार असून, उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 3 सप्टेंबरपासून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

मुंबई विभागामध्ये 3 लाख 20 हजार 491 जागांसाठी राबवण्यात आलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेर्‍या, विशेष फेरी व ‘प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य’ (एफसीएफएस) फेरीच्या तिन्ही प्रकारातील प्रवेश प्रक्रिया नुकतीच संपली. या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये 1 लाख 97 हजार 360 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, तर तब्बल 1 लाख 23 हजार 131 जागा रिक्त राहिल्या आहेत. रिक्त राहिलेल्या जागांमध्ये ऑनलाईन प्रवेशातील 97 हजार 331 जागा उपलब्ध असून, अल्पसंख्यांक, इन हाऊस व व्यवस्थापन कोट्यातील 25 हजार 800 जागा रिक्त राहिल्या आहेत. रिक्त राहिलेल्या जागांमध्ये कॉमर्सच्या सर्वाधिक 53 हजार 366 जागा असून, त्याखालोखाल सायन्सच्या 48 हजार 393 जागा आहेत. त्याचप्रमाणे आर्ट्सच्या 18 हजार 491 जागा असून, एचसीव्हीसी अभ्यासक्रमाच्या दोन हजार 881 जागा रिक्त राहिल्या आहेत.

- Advertisement -

दहावी फेरपरीक्षेचा निकालात उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी व आतापर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना नव्याने एफसीएफएस फेरी 3 सप्टेंबरपासून राबवण्यात येणार आहे. त्यामुळे या फेरीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी तब्बल 1 लाख 23 हजार जागा उपलब्ध झाल्या आहेत.

प्रवेशासाठी नवे वेळापत्रक जाहीर
दहावीच्या फेरपरीक्षेचा निकालाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून उत्तीर्ण विद्यार्थी व अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी एफसीएफएस फेरी राबवण्यात येत आहे. यापूर्वी प्रवेश घेतलेले विद्यार्थी आपला प्रवेश रद्द करून या फेरीमध्ये सहभागी होऊ शकतात. 3 ते 7 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना आपला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. 60 पेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना 9 ते 11 सप्टेंबरदरम्यान प्रवेश घेऊ शकतात. तर 35 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना 13 ते 14 सप्टेंबरदरम्यान प्रवेश घेता येणार आहे. तर एटीकेटीचे विद्यार्थी 16 ते 17 सप्टेंबरदरम्यान प्रवेश घेऊ शकतात.

- Advertisement -

कॉलेजमधील उपलब्ध जागांचा तपशील
शाखा -ऑनलाईन -अल्पसंख्यांक -इन हाऊस -व्यवस्थापन
आर्ट्स -14046 -2470 -946 -1029
कॉमर्स -41071 -6985 -2085 -3225
सायन्स -39846 -3754 -1758 -3035
एचएसव्हीसी -2368 -254 -64 -195
एकूण -97331 -13463 -4853 -7484

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -