ज्येष्ठ लेखक पावलो कोएलो यांनी बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यामुळे नवाजुद्दीनला गहिवरुन आले. त्याने वेळ न दडवता लगेच पावलो यांना प्रतिक्रिया दिली. पावलो यांच्या कौतुकामुळे आपल्याला झालेल्या आनंदाची भावना शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याचे तो म्हणाला. नवाजुद्दीन नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘सेक्रेड गेमम्स २’ या वेब सिरीजमध्ये दिसला होता. यामध्ये त्याने गणेश गायतोंडे नावाचे पात्र साकारले होते. त्याने त्या पात्राला चोख न्याय दिला होता. त्यामुळे फक्त देशातीलच नाही, तर जगभरातील प्रेक्षकांना नवाजुद्दीनच्या अभिनयाचे भुरड पडले. गणेश गायतोंडे या पात्रामुळे देशात नवाजुद्दीनचा एक वेगळा चाहतावर्ग तयार झाला आहे. हे चाहते नवाजुद्दीनच्या कामावर निस्सिम प्रेम करतात. याशिवाय नवाजुद्दीनने झगमगत्या बॉलिवूड दुनियेत केलेला संघर्ष आणि आता त्याच्या पदरात पडलेले यश या दोन्ही बाजूंचा विचार केला तर नवाजुद्दीन त्यासाठी योग्य ठरतो. ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सिरीजमध्ये नवाजुद्दीनच्या अभिनयाच्या विविध छटा प्रेक्षकांना पाहता आणि अनुभवता आल्या. त्यामुळेच त्याचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.
हेही वाचा – रमाबाईंचे विचार आणि जिद्द मनात खोलवर रुजतेय- शिवानी रांगोळे
नेमके काय म्हणाले पावलो कोएलो?
ज्येष्ठ साहित्यिक पावलो कोएलो यांनी ट्विटरवर नवाजुद्दीनच्या कामाचे कौतुक केले. ‘नेटफ्लिक्सवर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकीची ‘सेक्रेड गेम्स २’ फार सुंदर सिरीज आहे. यामध्ये त्याने फार सुंदर काम केले आहे’, असे पावलो म्हणाले.
One of the best series on Netflix, with the great actor @Nawazuddin_S https://t.co/LrEo5vLhTE
— Paulo Coelho (@paulocoelho) September 13, 2019
यावर नवाजुद्दीनने पावलो कोएलो यांना उत्तर दिले. नवाजुद्दीनने त्यांचे आभार मानले. तो म्हणाला, ‘पावलो सर आपण लिहिलेल्या कादंबरी मी वाचल्या आहेत. याशिवाय आपण लिहिलेल्या अल्केमिस्ट आणि ‘वेरोनिका डिसाइड टू डाय’ या दोन्ही कांदबरीवरील चित्रपट मी पाहिले आहेत. मी आपल्या लेखणीचा चाहता आहे. आपण माझ्या कामाची दखल घेऊन तोंडभरून कौतुक केले ही बाबच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि ती भावना शब्दांत व्यक्त करणे शक्य नाही.’ नवाजुद्दीनच्या या उत्तरानंतर पावलो यांनी पुन्हा नवाजुद्दीनचे कौतुक केले. नवाजुद्दीन ‘मी आपले मंटो, ठाकरे हे चित्रपटही पाहिले. आपण त्यातही सुंदर काम केले आहे. आपले मनापासून अभिनंदन’, असे पावलो म्हणाले.
Sir @paulocoelho I hv read ur books The Alchemist & also watched d film 'Veronika decides to Die' based on ur novel I hv always been an ardent fan of ur writing & it's an honour 2 be noticed & mentioned by someone like you I don't have words to describe the feeling
Thank You ? https://t.co/wNyhg5ltog— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) September 14, 2019
हेही वाचा – बर्थडे बॉय आयुष्मान खुराणा एकेकाळी ट्रेनमध्ये गाणे गात असे!