घरमुंबई१२५ वर्ष पूर्ण झाल्याने महापालिका ‘विशेष टपाल पाकीट’ काढणार!

१२५ वर्ष पूर्ण झाल्याने महापालिका ‘विशेष टपाल पाकीट’ काढणार!

Subscribe

१२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘विशेष टपाल पाकीट’प्रकाशित करण्याचे ठरवले आहे.

मुंबई महापालिकेच्या मुख्यालय इमारतीला १२५ वर्षे पूर्ण झाल्याने भारत सरकारच्या टपाल विभागाच्या विभागाकडून इमारतीचे छायाचित्र असलेले ‘विशेष टपाल पाकीट’ प्रकाशित करण्यात येणार आहे. या छपाई करण्यात येणार्‍या टपाल पाकीटांची संख्या २ हजार इतकी असणार आहे. त्यामुळे लवकरच प्रकाशन सोहळा पार पाडून हे मुख्यालय इमारतीचे छायाचित्र असलेले टपाल पाकीट लोकांच्या हाती पडणार आहे.

मुंबई महापालिकेच्या मुख्यालय इमारतीचे शतकोत्तर रौप्य महोत्सव ३१ जुलै २०१८ रोजी पूर्ण झाले. महापालिका मुख्यालयाला जेव्हा १०० वर्षे पूर्ण झाली होती. तेव्हाही टपाल खात्याने महापालिका मुख्यालय जुनी इमारत ‘विशेष टपाल पाकीट’प्रकाशित केले होते. त्याच धर्तीवर १२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘विशेष टपाल पाकीट’प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. याला गटनेत्यांची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर प्रकाशनाची कार्यवाही केली जाणार आहे.

- Advertisement -

सहायक पोस्ट मास्टर जनरल एच.सी.पटेल यांनी महापालिकेला पत्र लिहून ‘विशेष टपाल पाकीट’प्रकाशन करण्यास परवानगी मागितली आहे. त्यामुळे प्रकाशनासाठी लागणारे शुल्क महापालिकेला भरण्याचेही कळवले आहे. कार्यालयीन दिवशी नि महापालिका मुख्यालयात कामाच्या दिवशी हा प्रकाशन सोहळा आयोजित करणे संयुक्तिक राहील आणि त्यासाठी २५ हजार रुपये एवढे शुल्क भरण्याचे कळवले आहे. त्यामुळे ‘विशेष टपाल पाकीट’ची छपाई करण्यास मंजुरी मिळाल्यानंतरच महापालिका मुद्रणालयाकडून छपाई करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -