घरमुंबईमहिलेचा ऑनलाईन विनयभंग, विकृताला अटक

महिलेचा ऑनलाईन विनयभंग, विकृताला अटक

Subscribe

सोशल मीडियावर महिलेचा विनयभंग करणाऱ्या विकृताला ओशिवरा पोलिसांनी केली अटक.

महिलांचा विनयभंग होण्याच्या घटना वारंवार घडत असताना आता सोशल मीडियावर देखील महिलांचा विनयभंग होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अंधेरी परिसरात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. एका जाहिरात कंपनीमध्ये वरीष्ठ पदावर काम करणाऱ्या एका महिलेला सोशल मीडियावर अश्लील मेसेज आणि फोटो टाकून तिचा विनयभंग करणाऱ्या एका विकृताला पोलिसांनी अटक केली आहे. नोकरीची शिफारस करून देखील सदर महिला नोकरीचं काम करू शकली नाही, म्हणून त्याचा सूड उगवण्यासाठी या विकृताने हा मार्ग निवडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. नितीन शितलाप्रसाद मिश्रा असं या २८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच फरार झालेल्या या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर कोर्टात दाखल केलं. तेव्हा त्याची १५ हजारांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

नोकरीचं काम न केल्यामुळे विकृताचं पाऊल

तक्रारदार महिला एका जाहिरात कंपनीमध्ये एचआर विभागात वरीष्ठ पदावर काम करते. त्यांचं लिंक्डइन या सोशल नेटवर्किंग साईटवर अकाऊंट आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची नितीनशी इथे ओळख झाली होती. पुढे त्यांची मैत्री देखील झाली. यादरम्यान, नितीनने त्यांना नोकरीसाठी मदत करण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी प्रयत्न देखील केले. मात्र नोकरीचं काम काही होऊ शकलं नाही. दरम्यान, यामुळे नाराज झालेल्या नितीनने त्यांना लिंक्डइन, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईट्सवर अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून त्रास द्यायला सुरुवात केली.

- Advertisement -

फरार नितीन मिश्रा पोलिसांना सापडला!

हे मेसेज पाहाताच सदर महिलेने नितीनला सर्व अकाऊंट्सवर ब्लॉक केलं. त्याची तक्रार ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी अर्ज करून केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नितीनविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या नितीन मिश्रा याला सोमवारी पोलिसांनी अटक केली. तो मूळचा उत्तर प्रदेशच्या प्रयागराज, करेलाचा रहिवासी आहे. अटकेनंतर त्याला सोमवारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले, यावेळी कोर्टाने त्याची पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -