दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात पोलीस आयुक्तालयासमोरील अहमद नामक इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईतील एलटी मार्गावरील ही घटना आहे. ही इमारत ४ मजली असून ६ महिन्यांपूर्वीच ती रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नसल्याचे समजते.
Mumbai: A portion of a four-storied building at Lokmanya Tilak Road collapses; 7 Mumbai fire brigade vehicles including ambulance and rescue vehicle rushed to the spot pic.twitter.com/WPW49bzw9C
— ANI (@ANI) September 20, 2019
याबाबत मिळाले्या अधिक माहितीनुसार, दक्षिण मुंबईत क्रॉफर्ड मार्केट परिसरात लोकमान्य टिळक रोडवरील ४ मजली अहमद या इमारतीचा काही भाग सकाळी १०. ४५ वाजण्याच्या सुमाराला कोसळला. या इमारतीत व्यावसायिक गाळे होते. ही इमारत जुनी आणि धोकादायक असल्याने काही दिवसांपूर्वी ही इमारत रिकामी करण्यात आली होती. यामुळे आजच्या घटनेत जीवितहानी टळली आहे.