घरमुंबईप्रियकर भेटायला आला नाही म्हणून प्रेयसीची व्हिडिओ कॉलिंगवर आत्महत्या!

प्रियकर भेटायला आला नाही म्हणून प्रेयसीची व्हिडिओ कॉलिंगवर आत्महत्या!

Subscribe

प्रियकर भेटायला आला नाही म्हणून एका १९ वर्षांच्या प्राची कश्यप या तरुणीने वांद्रे येथील राहत्या घरी घरी आत्महत्या केली. व्हिडीओ कॉल करुन तिने जीवन संपविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी तिच्या पालकांसह प्रियकराची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून या जबानीनंतर वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. ही घटना वांद्रे येथील जरीमरी मंदिराजवळील तलावासमोरील एका निवासी इमारतीमध्ये घडली.

प्राची ही मूळची आसामच्या गुवाहाटीची रहिवाशी असून तिचे वडिल आसाम पोलीस दलात पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. प्राची ही तिच्या पुढील शिक्षणासाठी मुंबईत आली होती. सध्या ती जरीमरी मंदिराजवळील एका निवासी इमारतीमध्ये राहत होती. वांद्रे येथील एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिची एका १९ वर्षांच्या तरुणासोबत मैत्री झाली होती. या मैत्रीचे नंतर पे्रमात रुपांतर झाले होते. ते दोघेही एकमेकांना भेटत होते. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातनू नेहमीच एकमेकांच्या संपर्कात होत?. शनिवारी तिने त्याला तिच्या घरी बोलाविले होते, मात्र त्याने घरी येण्यास नकार दिला होता. त्यानंतर तिने त्याला व्हिडीओ कॉल करुन आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले.

- Advertisement -

काही वेळानंतर तिने तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार नंतर तिच्या प्रियकराने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सांगितली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिथे त्यांना प्राचीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. तिला भाभा रुग्णालयात दाखल केले असता तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. ही माहिती नंतर तिच्या आसाम येथे राहणार्‍या पालकांना कळविण्यात आली. रविवारी तिचे पालक मुंबईत आले होते. यावेळी तिच्या पालकांसह तिच्या प्रियकराची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. तिच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही. प्रियकर भेटायला आला नाही म्हणून तिने जीवन संपविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या घटनेने शनिवारी रात्री स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -