घरमुंबईकेडीएमसीच्या महासभेत इंजिनाला कमळाची साथ!

केडीएमसीच्या महासभेत इंजिनाला कमळाची साथ!

Subscribe

केडीएमसीच्या महासभेत खड्ड्यांचा प्रश्नावरून गोंधळ उडाला असून मनसेला भाजपची साथ मिळल्यामुळे शिवसेनेला एकट पाडल्याचे दिसून आले.

राज्यात सत्तास्थापनेवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू असतानाच गुरुवारी केडीएमसीच्या महासभेत रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरुन भाजपने मनसेला साथ देत शिवसेनेला एकट पाडल्याचे दिसून आले. रस्त्यावरील खड्डयांवरुन महासभेत एकच गोंधळ उडाला. महापौरांनी सभा तहकूब करण्याची मागणी फेटाळल्याने भाजप नगरसेवक आक्रमक बनले. त्यांनी सभात्याग केल्यानंतर अखेर महापौर विनिता राणे यांना सभा तहकूब करावी लागली.

सत्ताधारी आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ सभा तहकूब

महापालिका मुख्यालयातील सभागृहाचे दुरुस्ती काम सुरू असल्याने कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात महासभेचे आयोजन करण्यात आले होते. रस्त्यावरील खड्डे अजूनही भरण्यात आलेले नसल्याने नागरिकांना खड्डयांचा खूपच त्रास सहन करावा लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी सत्ताधारी आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ सभा तहकूब केली होती. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी रस्त्यावरील खड्डयांच्या प्रश्नावरुन प्रशासनाला धारेवर धरले. मात्र महापौर विनिता राणे यांनी रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजविण्यात यावे अशी सुचना करीत, सभा तहकूब करणे मागे घ्यावी अशी विनंती भोईर यांना केली.

- Advertisement -

महापौरांना विचारला जाब 

मात्र भाजपचे गटनेता विकास म्हात्रे यांनी मनसेची पाठराखण करीत सभा तहकूब करण्यावर मतदान घेण्याची मागणी केली. खड्डे बुजविण्यात प्रशासन आणि सत्ताधारी अपयशी झाल्याची कबुली देत असेल तर तहकूब मागे घेईन या भूमिकेवर भोईर ठाम होते. त्यामुळे महापौरांनी सभा तहकूब करण्याची मागणी फेटाळण्यात येत असल्याचे सांगितले. त्यावरुन सभागृहात एकच गोंधळ उडाला. मनसेचे गटनेता मंदार हळबे यांनी कुठल्या नियमाने सभा तहकूब करण्याची मागणी फेटाळली या विषयी महापौरांना जाब विचारला. अखेर भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने महापौरांनी सभा तहकूब करावी लागली.


हेही वाचा – गोरेगावचा नया नगर नाला अतिक्रमणमुक्त

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -