घरमुंबईमुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला सर्वसंमती - शरद पवार

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला सर्वसंमती – शरद पवार

Subscribe

‘उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत साशंकता नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वसंमती झाली आहे’, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. मुंबईच्या नेहरु सेंटर येथे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्रीपदासह सत्ता स्थापनेच्या दावा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. ही बैठक संपल्यानंतर शरद पवार नेहरु सेंटरमधून बाहेर पडले. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सर्वसंमती झाले असल्याचे म्हटले. या व्यतिरिक्त पवारांनी इतर विषयांवर बोलणे टाळले. ‘लवकरच महाविकासआघाडी एकत्र पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ’, असे पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे देखील बैठकीतून बाहेर

शरद पवार यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बैठकीतून बाहेर आले. यावेळी उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले. ‘उद्या राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण माहिती दिली जाईल’, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -