घरमहाराष्ट्रमाजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लग्नात भेटले; दोघांमध्ये दिलखुलास गप्पा

माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लग्नात भेटले; दोघांमध्ये दिलखुलास गप्पा

Subscribe

राज्यात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा विधानसभेचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात हे दोन्ही नेते शेजारी बसले होते. तब्बल अर्धा तास या दोन नेत्यांमध्ये गुफ्तगू झाली असल्याची माहिती मिळत आहे. काही वऱ्हाडी मंडळींनी या दोन नेत्यांचा गप्पांचा व्हिडिओ देखील काढला आहे.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये लग्नाच्या मांडवात चर्चा

आमदार संजय शिंदेंच्या मुलाच्या लग्नात अजित पवार – देवेंद्र फडणवीसांमध्ये गुफ्तगू | काय चर्चा करत असतील?

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 8, 2019

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये दोन्हीही नेते गप्पा मारत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. संजयमामा शिंदे हे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार आहेत. अजितदादांच्या जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. संजय शिंदे यांचा मुलगा यशवंत शिंदे यांचा शाही विवाह सोहळा सोलापुरात संपन्न झाला. माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासहीत अनेक नेत्यांनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती.

महा विकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या चर्चेला कंटाळून दि. २३ नोव्हेंबरच्या पहाटे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले होते. मात्र शरद पवार यांच्या प्रयत्न आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी समजूत काढल्यामुळे अवघ्या ८० तासांत अजित पवार यांनी माघार घेऊन देवेंद्र फडणवीस यांना तोंडघशी पाडले होते. विधानसभेतील विशेष अधिवेशनाचा अपवाद वगळला तर आज पहिल्यांदा हे दोन नेते एकमेकांच्या समोरासमोर आलेले पाहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -