घरक्रीडाठाणे शहर पोलीस, कै. विवेक मनिष स्मृती चौथ्या फेरी

ठाणे शहर पोलीस, कै. विवेक मनिष स्मृती चौथ्या फेरी

Subscribe

ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

ठाणे शहर पोलीस, कै. विवेक मनिष स्मृती, जॉय युवा प्रतिष्ठान, सिटीझन पतपेढी, सेंच्युरी रेयॉन यांनी ठाणे जिल्हा कबड्डी असो.ने शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ६४व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या व्यावसायिक गटाच्या चौथ्या फेरीत धडक दिली. वृंदावन-श्रीरंग सोसायटी, ठाणे येथील स्व. अनिल शंकर जाधव क्रीडांगणावर सुरू असलेल्या व्यावसायिक गटाच्या तिसर्‍या फेरीच्या सामन्यात ठाणे शहर पोलिसांनी रिद्दी-सिद्धी बिल्डरला २१-१९ असे चकवीत आगेकूच केली.

कै. विवेक मनिष स्मृती संघाने उल्हासनगर महानगर पालिकेवर २६-१६ अशी मात केली. जॉय युवा प्रतिष्ठानने मध्यांतरातरातील ०६-२० अशा १४ गुणांच्या पिछाडीवरून स्व. सुरेश शेठ प्रतिष्ठानचा ३३-३० असा पाडाव करीत आपली आगेकूच सुरू ठेवली. तर सेंच्युरी रेयॉनने बदलापूर-कुळगाव नगर पालिकेवर ३३-२७अशी मात केली. परेश म्हात्रे, हनुमान साळुंखे सेंच्युरीकडून, तर सागर पाटील, अनिकेत म्हात्रे पराभूत संघाकडून उत्कृष्ट खेळले.

- Advertisement -

पुरुष व्दितीय श्रेणी गटाच्या तिसर्‍या फेरीत रॉडीकल स्पोर्टसने ५-५ चढायांच्या डावात ओम ज्ञानदिपचा ३१-३० असा पाडाव करीत चौथ्या फेरीत प्रवेश केला. साईराज मंडळाने अत्यंत चुरशीच्या लढतीत रणझुंजार मंडळाला २६-२२ असे नमवित आपली आगेकूच सुरू ठेवली. श्री स्वामी समर्थने आई गावदेवीवर २०-१७ असा विजय मिळविला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -