घरलाईफस्टाईलओव्याचे औषधी गुणधर्म

ओव्याचे औषधी गुणधर्म

Subscribe

जाणून घ्या ओव्याचे आरोग्यदायी फायदे

ओवा हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे. हा चवीला तिखट असला तरी औषध म्हणून या पदार्थाचा सर्रास वापर केला जातो. ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. याशिवाय फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात असतात. त्यामुळे ओव्याचा नैसर्गिक औषध म्हणून वापर केला जातो. ओवा हा अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. चला तर जाणून घेऊया ओव्याचे काही औषधी गुणधर्म.

सर्दीवर गुणकारी

- Advertisement -

सर्दी पडसा या वारंवार होणाऱ्या आजारांपासून बचाव व्हावा यासाठी ओवा वापरला जातो. एका कपड्यात किंवा डबीत ओव्याचीपूड ठेवून त्याचा सुगंध दिवसातून पाच – सहा वेळा घेतल्यास नाकातील बंद पडलेल्या नासा खुलून सर्दीपासून आराम मिळतो. ओव्याचीपूड गुळामध्ये मिसळून त्याचे छोटे छोटे गोल गोळे बनवून रोज सकाळ संध्याकाळी घेतल्यास खोकला आणि अस्तमाच्या तसेच श्वसनाच्या आजारापासून मुक्तता होते. तसेच सर्दी-खोकला आणि कफ कमी होण्यासाठी ओव्याची धुरी घ्या अथवा ओवा तव्यावर गरम करून कापडाच्या पुरचुंडीने त्याचा शेक छातीला द्या. या उपायाने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. नाक मोकळे होण्यासाठी या पुरचुंडीचा वास घ्या. त्यामुळे तुमचे चोंदलेले नाक लवकर मोकळे होण्यास मदत होईल.

पित्त आणि उलटी

- Advertisement -

पित्ताचा त्रास होत असल्यास ओवा खाणे फार फायदेशीर ठरते. यासाठी ओवा, सैंधव आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर घ्यावी. यामुळे पित्त आणि उलटी सारखे त्रास दूर होतात.

हृदयासंबंधी समस्या

ओव्याचीपूड एका कपभर गरम पाण्यासोबत नित्याने सेवन केल्यास हृदयाच्या संबंधी विविध आजारांपासून मुक्तता मिळते. हृदयासंबंधी विविध समस्यांवर ओवा एक गुणकारी औषधी मानली जाते.

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करण्यासाठी ओव्याचे पाणी रामबाण उपाय आहे. ओव्याचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या. यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते आणि तुमचे वजन देखील कमी होते.

बालकांच्या पोटातील दुख्ण्यावरील उपाय

ओव्याचे बीज नवजात बालकांच्या पोटातील दुखण्यावर फारच प्रभावशाली मानले जाते. ओव्याचीपूड स्तनातून काढलेल्या दुधात चिमुटभर मिसळून किंवा स्तनावर थोडीसी लेपून नवजात बालकांच्या पोटातील दुखणे आणि फुगव्यावर फार उपयोगी ठरू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -