घरमुंबईरस्त्यांच्या ३६६ कोटींच्या १५ कामांना मंजुरी

रस्त्यांच्या ३६६ कोटींच्या १५ कामांना मंजुरी

Subscribe

बहुचर्चित रस्ते कामांच्या प्रस्तावांना अखेर स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. पटलावर ठेवण्यात आलेल्या ५ प्रस्तावांसह जादा विषयांसह सादर केलेल्या १० अशा एकूण १५ रस्ते कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मात्र, रस्त्यांच्या पाच प्रस्तावांना विरोध न करणार्‍या भाजपने जादा विषय असलेल्या १० प्रस्तावांना विरोध केला. परंतु, यापूर्वी बैठकीच्या आदल्यादिवशी आलेल्या प्रस्तावांना शिवसेनेच्या मदतीने मंजुरी देणार्‍या भाजपने मात्र, याठिकाणी विरोध दर्शवला. शिवसेनेने, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाच्या मदतीने हे सर्व रस्ते कामांचे प्रस्ताव पुढे रेटून नेले.

वादग्रस्त ठरलेल्या रस्ते कंत्राट कामांच्या पात्र कंत्राटदारांनी दहा टक्क्यांपर्यंत दर आणून काम करण्याची तयारी दर्शवली. अशा एकूण १५ रस्ते कामांचे प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवून उर्वरीत कामांच्या फेरनिविदा मागवल्या आहे. त्यामुळे या १५ रस्ते कामांपैंकी पाच प्रस्ताव नियमित विषय पत्रिकेवर तर दहा प्रस्ताव जादा विषय म्हणून सोमवारी सदस्यांना पाठवण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे प्रस्ताव मंजुरीला आले असता, भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी यातील अटींकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्ते कामांची पाहणी करण्यासाठी त्रयस्थ पक्षकाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. परंतु, यापूर्वी नेमलेल्या त्रयस्थ पक्षकाराचा अनुभव पाहता आपल्या दक्षता पथकामार्फत याची तपासणी करावी,अशी सूचना त्यांनी केली. त्याची दखल घेण्याची सूचना करत अध्यक्षांनी पटलावर ठेवण्यात आलेले पाचही प्रस्ताव संमत केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -