घरमुंबईशिक्षकाची अशैक्षणिक कामे बंद

शिक्षकाची अशैक्षणिक कामे बंद

Subscribe

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

जहाजांच्या कप्तानाकडून आम्ही गुणवत्तेची अपेक्षा करतो व त्यांना २५० अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवतो. केंद्र सरकारपासून जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या सर्व कामांचा समावेश आहे. मुळात शिक्षण सोडून बाकी सर्व त्यांना करावे लागते. ते आम्ही आता टप्प्याटप्प्याने बंद करणार आहोत, असे सांगत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांना दिलासा दिला.

बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने सायन येथे मुख्याध्यापक भवनात शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा अध्यक्षीय दिन सन्मान सोहळ्यात सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. वर्षा गायकवाड यांनी शिक्षणमंत्री होऊन मला 15 दिवस झाले आहेत. पण मी स्वत: शिक्षिका असल्याने मला शाळा-मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे अनेक प्रश्न माहिती असल्याचे म्हटले. आम्ही जहाजांच्या कप्तानाकडून गुणवत्तेची अपेक्षा करतो व त्यांना २५० अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवतो, हे योग्य नाही. यात केंद्र सरकारपासून जिल्हाधिकार्‍यांपर्यंत सर्व कामांचा समावेश आहे. शिक्षण सोडून बाकी सर्व त्यांना करावे लागते. ते आम्ही आता टप्प्याटप्प्याने बंद करणार आहोत.

- Advertisement -

त्याबरोबर मुख्याध्यापक संघटनेच्या प्रतिनिधींना घेऊन शैक्षणिक प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा सुरू असून तो प्रश्न ही लवकरच मार्गी लावू असे त्या म्हणाल्या. शिक्षकांनी त्यांचे प्रश्न इतर कोणत्याही माध्यमापेक्षा चर्चेने सोडवावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष शंकर पवार, दिलशाद थोबानी, सचिव प्रशांत रेडीज यांच्या हस्ते खासदार एकनाथ गायकवाड, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख, मुंबई महापालिकेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबई विभागाचे सहाय्यक शिक्षण उपसंचालक भास्करराव बाबर व महाराष्ट्र मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते मुंबई विभागातील प्रत्येक वॉर्डमधील एक गुणवंत मुख्याध्यापक अशा १७ उत्तम शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाार्‍या मुख्याध्यापक, सेवानिवृत्त सदस्य, माजी अध्यक्ष, राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक व इतर बिगर राजकीय संस्थाचालक, शिक्षक संघटनांच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -