घरमुंबईस्टेरॉइड्सच्या अतिसेवनाने शरीरसौष्ठवपटूचा मृत्यू

स्टेरॉइड्सच्या अतिसेवनाने शरीरसौष्ठवपटूचा मृत्यू

Subscribe

स्टेरॉइड्सचं अतिसेवन केल्यामुळे मुंब्र्यात एका युवा शरीरसौष्ठवपटूचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शरीरसौष्ठव स्पर्धांची क्रेझ हल्ली सगळीकडेच पाहायला मिळते. तरूणाई मोठ्या प्रमाणावर शरीर कमावण्यासाठी कसरत करताना पाहायला मिळते. मात्र, त्यासाठी अनेक तरुण हे चुकीच्या मार्गांचा देखील वापर करताना पाहायला मिळत आहेत. ज्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. अशीच एक दुर्देवी घटना ठाण्याजवळच्या मुंब्र्यात घडली आहे. शरीरसौष्ठव कमावण्यासाठी स्टेरॉईडच्या अतिसेवनामुळे एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. नावेद जमील खान असे या तरुणाचे नावस असून तो कौसा येथील चांदनगरमधल्या अश्रफ कंपाऊंडमध्ये राहातो.

स्टेरॉइड्सचे जास्त डोस

नावेदला शरीरसौष्ठव कमावण्याची आवड होती. २६ जानेवारी रोजी परिसरात शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये विजय मिळवण्याचा निर्धार नावेदनं केला होता. विजय मिळवण्याचं वचनदेखील त्याने त्याच्या प्रशिक्षकाला दिलं होतं. पण शरीर कमावण्यासाठी नावेद जिमला जाण्यासोबतच स्टेरॉईड्स घ्यायचा. स्पर्धा जिंकण्यासाठी म्हणून त्यानं स्टेरॉईड्सचे जास्त डोस घेतले. मृत्यूनंतर त्याच्या शरीराच्या तपासणीमध्ये स्टेरॉईडचे ३ डोस आढळले.

- Advertisement -

यकृत बंद पडलं

स्टेरॉईडच्या अतिसेवनामुळे नावेदची प्रकृति खालावली होती. त्याचं यकृत देखील काम करणं बंद झालं. २५ जानेवारीला त्रास जाणवू लागल्यामुळे त्याला कौसामधल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपासणी करून त्याला परत घरी पाठवलं. पण घरी परत येत असताना रुग्णवाहिकेतच त्याचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -