घरमुंबईदिल्ली ते मुंबई हायपरलूप ट्रान्सपोर्टचा प्रस्ताव

दिल्ली ते मुंबई हायपरलूप ट्रान्सपोर्टचा प्रस्ताव

Subscribe

‘व्हर्जिन’ समूहाचे मालक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडणारा हायपरलूप ट्रान्सपोर्ट प्रकल्प सुरु करण्याची गळ ब्रॅन्सन यांनी घातली आहे. मुंबई-पुणे मार्गावरील ‘व्हर्जिन’ कंपनीच्या प्रस्तावित हायपरलूप प्रकल्पाचं कामकाज बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने गेल्या महिन्यात घेतल्यानंतर ब्रॅन्सन यांनी पर्यायी मार्ग सुचवला आहे.

नव्या तंत्रज्ञानाच खुलेपणाने स्वागत करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नितीन गडकरींशी ‘व्हर्जिन’ समूहाने संपर्क साधला. दिल्ली आणि मुंबई दरम्यान 1300 किलोमीटरची लाइन विकसित करण्याची गडकरींना विनंती करण्यात आली. पुढील दोन दिवस ‘व्हर्जिन’ समूहाचे अधिकारी भारतात आहेत. तंत्रज्ञानासाठी विविध गुंतवणूकदारांची भेट ते घेत आहेत.

- Advertisement -

‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’च्या एलन मस्क यांनी हायपरलूप वाहतूक तंत्रज्ञानाची 2013 मध्ये जगाला प्रथम ओळख करुन दिली. हायपरलूप वाहतूक व्यवस्थेसाठी कमी दाबाचा चॅनेल किंवा बोगदा तयार करायचा. अगदी कमी हवेच्या घर्षणासह खास डिझाइन केलेल्या ‘पॉड’मधून (ट्रेनसदृश) वाहतूक करायची. हे पॉड चाकांवर नव्हे तर हवेवर धावतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -