घरलाईफस्टाईलनारळाचे 'पाणी' आरोग्यदायी

नारळाचे ‘पाणी’ आरोग्यदायी

Subscribe

नारळाच्या पाण्यात कमी कॅलरीज आणि सर्वात कमी कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे प्रमाण असते. त्यामुळे नारळाचे पाणी हे आरोग्यदायी पेय आहे. तसेच नारळाचे पाणी प्यायल्याने अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. जाणून घेऊया नारळ्याच्या पाण्याचे आरोग्यदायी फायदे.

नारळ हे बाराही महिने उपलब्ध असणारे फळ आहे. नारळाच्या पाण्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे नारळाचे पाणी पिणे शरिरास लाभदायी असते. नारळाच्या पाण्याचे अनेक लाभदायी फायदे जाणून घेऊया.

  • सध्याच्या धावपळीच्या जीवनात थकवा हा सर्रास येतो. मात्र हा थकवा दूर करण्यासाठी नारळाचे पाणी हा एक गुणकारी उपाय आहे. नारळाचे पाणी प्यायल्याने थकवा दूर होऊन शरीरातील ताकद टिकवून ठेवण्यास मदत होते.
  • नारळामध्ये अॅण्टी बॅक्टेरियल, अॅण्टी फंगल आणि अॅण्टी व्हायरल या गुणांमुळे बाहेरील इन्फेक्शपासून बचाव होण्यास मदत होते. त्याचबरोबर नारळाचे पाणी आणि खोबरे खाल्यास पचनशक्तीही मजबूत राहते.
    coconut-water
  • वजन घटवण्यासाठी नारळाचे पाणी प्यावे. नारळामध्ये फायबर असल्याने नारळ पाणी किंवा खोबरे खाल्ले तर कॅलरीज वाढत नाहीत. ज्यावेळी भूक लागते त्यावेळी नारळाच्या पाण्याचे सेवन करावे यामुळे पोट देखील भरते आणि वजन देखील वाढत नाही.
  • नारळाचे पाणी थंड असल्यामुळे ते उष्णतेवर नियंत्रण ठेवते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी नारळाचे पाणी प्यावे. यामुळे शरिरातील उष्णता निघून जाण्यास मदत होते.
  • नारळाचे पाणी पित्त नष्ट करण्यास मदत करते. दररोज जेवणाच्या अर्धा तास अगोदर नारळाचे पाणी प्यायल्याने पाचक प्रणाली सुधारते. यामुळे पित्त नष्ट करण्यासाठी नारळाचे पाणी हा एक उत्तम उपाय आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -