घरताज्या घडामोडीशिवसेनेच्या उपनेतेपदी सचिन अहिर यांची नियुक्ती

शिवसेनेच्या उपनेतेपदी सचिन अहिर यांची नियुक्ती

Subscribe

सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन सचिन अहिर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन अहिर यांच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन सचिन अहिर यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

आदित्य ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

‘माझे सहकारी सचिन अहिरजी तुमची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आता फक्त वरळीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी तुम्ही अधिक जोमाने काम कराल असा मला विश्वास आहे.’

- Advertisement -

- Advertisement -

सचिन अहिरने दिले धन्यवाद

‘पाठिंबा आणि विश्वास दाखवल्याबद्दल धन्यवाद’, असे म्हणत सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंचे आभार व्यक्त केले आहेत.

सचिन अहिर यांच्याविषयी थोडक्यात

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करत हातावर शिवबंधन बांधून घेतले होते. अहिर हे सलग सहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष होते. आतापर्यंत त्यांनी चार टर्म म्हणजे १२ वर्षे मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक महत्त्वाचे नेते होते. १९९९ साली जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली, तेव्हापासून ते पक्षाचे संस्थापक सदस्य म्हणून पक्षात होते. अतिशय कमी वयातच त्यांना पक्षाच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये बसण्याचा मान मिळाला होता. सत्तेत असताना त्यांच्यावर गृहनिर्माण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. तसेच शरद पवारांच्या पुण्याईमुळे ते गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष होते. तर २०१४ साली वरळीतून पराभव झाल्यानंतर त्यांच्यावर सलग दोन टर्म मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.


हेही वाचा – मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची वर्णी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -