घरताज्या घडामोडीआशिष शेलारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Subscribe

या भेटीत सुमारे तासभर चर्चा झाली असली तरी मात्र या भेटीच कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.

आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. राज ठाकरे आणि आशिष शेलार हे दोघे चांगले मित्र असून ते नेहमी एकमेकांची भेट घेत असतात. मात्र आजच्या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. या भेटीत दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा रंगली होती. मात्र भेटीच कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.

राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने आता हिंदुत्वाच्या मार्गाने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे कित्येक दिवसांपासून भाजप आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होणार अशी चर्चा सुरू आहे. तसंच सध्या भाजप नेत्यांच्या राज ठाकरे सोबत भेटीगाठी वाढत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात भाजप आणि मनसे बाबतच्या चर्चा रंगल्या आहेत.

- Advertisement -

राज्यात विधानसभा निवडणुकीपासून राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकाबाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि मनसे असं चित्र निर्माण झालं आहे. तसंच आता भाजप आणि मनसेमध्ये राजकीय जवळीक वाढत चालली असल्याचं दिसत आहे. नवी मुंबई आणि औरंगाबाद निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काहीतरी राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता म्हटलं जात आहे.


हेही वाचा – …म्हणून रश्मी ठाकरेंनी घेतली ‘सामना’च्या संपादकपदाची सूत्रं!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -