घरताज्या घडामोडीकरोनाच्या चार संशयितांवर मुंबईत उपचार

करोनाच्या चार संशयितांवर मुंबईत उपचार

Subscribe

महाराष्ट्रात करोनाच्या सहा संशयितांवरजणांवर उपचार सुरू असून मुंबईत ही चौघांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

करोना व्हायरसने सध्या जगभरात हाहाकार माजवला असून भारतातही करोनाने हात पसरले आहेत. सध्या भारतात वेगवेगळ्या ठिकाणी २८ रुग्ण आढळले आहेत. तर, महाराष्ट्रात सहा जणांवर उपचार सुरू असून मुंबईत ही चौघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, करोनाचा महाराष्ट्रात एकही रुग्ण नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. शिवाय, करोनामुळे मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच टक्के असून खबरदारीच्या उपायांसाठी नागरिकांनी मास्कऐवजी रुमाल वापरण्याचं ही आवाहन टोपे यांनी केलं आहे.

परदेशी प्रवाशाची तपासणी आवश्यक

आतापर्यंत मुंबईत आलेल्या ५५१ आंतरराष्ट्रीय विमानातील ६५ हजार १२१ प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले आहे. राज्यात बाधित देशातून ४०१ प्रवासी आले असून आतापर्यंत १५२ प्रवाशांना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची दोन वेळेस प्रयोगशाळा चाचणी केली. त्यापैकी, १४९ लोकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तसंच, १४३ जणांना घरी सोडले आहे. दरम्यान, राज्यात सध्या सहा जण दाखल असून पुणे येथे दोन जण नायडू आणि मंगेशकर हॉस्पिटलमध्ये निरीक्षणाखाली आहेत. मुंबई येथे चार जण कस्तुरबा आणि हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

- Advertisement -

सिनेमा हॉल्समध्ये जिंगलद्वारे जागरुकता

या विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये बॅनर्स, पोस्टर्स, होर्डींग, दृकश्राव्य माध्यमांवर जाहिराती, चित्रपटगृहांमधून संदेश प्रसारण आदी उपक्रम हाती घेण्यात येत आहे. सोशल मीडियातून अधिकृत संदेश पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासंदर्भात सध्या सोशल मीडियातून जो चुकीचा प्रचार केला जात आहे. तो रोखण्यासाठी सायबर क्राईमच्या अतिरिक्त महासंचालकांशी चर्चा करण्यात आली आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबईतील हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्ष सज्ज

मुंबईत कस्तुरबा, राजावाडी, कुर्ला, वांद्रे, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर येथे विलगीकरण कक्षाची सुविधा करण्यात आली आहे. त्याचबरोबर, सर्व जिल्हा हॉस्पिटलमध्ये किमान दहा खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.

- Advertisement -

काय आहेत लक्षणे

करोनाच्या सर्दी, ताप, खोकला या लक्षणांनुसार उपचार केले जात आहेत. त्याचबरोबर रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. शिंकणे, खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होतो. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक शिष्टाचार पाळणे आवश्यक असून खोकताना, शिंकताना नाका तोंडावर रुमाल ठेवावा.


हेही वाचा – चीनमधून आली मांजर, म्हणून उडाली खळबळ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -