घरलाईफस्टाईलकेळी खा आणि मस्त रहा!

केळी खा आणि मस्त रहा!

Subscribe

केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे.

केळी हे असे फळ आहे, जे बाराही महिने बाजारात सहजरित्या उपलब्ध असते. त्यामुळे केळ्याचे सेवन करावे. मात्र, आपण खात असलेल्या फळाचे जर फायदे आपल्याला माहिती असतील तर ते आपण न विसरता आणि आवडीने खातो. चला तर जाणून घेऊया केळी खाण्याचे फायदे.

उर्जा मिळते

- Advertisement -

दोन केळी खाल्ल्याने शरीराला पुढील ९० मिनिटांपर्यंत उर्जा मिळते. त्यामुळे जे अधिक कष्ट करतात त्यांनी केळ्याचे सेवन करावे. त्याचा अधिक फायदा होतो.

तणाव दूर होतो

- Advertisement -

आपल्याला तणाव जाणवत असल्यास केळी खावी यामुळे तणाव दूर होण्यास मदत होते.

रक्तप्रवाह सुरळीत राहतो

ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे. केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो.

हाडे मजबूत होतात

केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून घेते. यामुळे हाडे मजबूत होतात.

चयापचयाची क्रिया सुधारते

केळ्यांमध्ये पोषक तत्वांचा खजिना असतो. या पोटॅशियम, फॉलिक Acid , व्हिटामिन ए, बी, बी ६, आर्यन, कॅल्शियम असते. यामुळे चयापचयाची क्रिया सुधारण्यास मदत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -