घरCORONA UPDATEधक्कादायक : अंत्यसंस्कारासाठी गेले आणि कोरोनाबाधित झाले

धक्कादायक : अंत्यसंस्कारासाठी गेले आणि कोरोनाबाधित झाले

Subscribe

बदलापूरमध्ये तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बदलापूरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ६६६ वर गेली आहे. आज राज्यात २४ तासात नव्या ९२ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, या कोरोनाने आता बदलापूरमध्ये देखील शिरकाव केला आहे. बदलापूरमध्ये तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये एकाच घरातील दोन जणानांना कोरोनाची लागण झाली असून वोक्हार्ट रुग्णालयातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊन असताना देखील एक कुटुंब नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी साताऱ्याला गेले होते. त्या दरम्यान, या कुटुंबातील ४५ वर्षाच्या पोलिसाच्या पत्नीला आणि तिच्या २० वर्षाच्या मुलीला त्याठिकाणी कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. तर २८ वर्षाचा तिसरा रुग्ण हा वोक्हार्ट रुग्णालयातील असून बदलापूरमध्ये राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांनाही बदलापूरमधील पालिकेच्या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून त्यांना कोव्हिड स्पेशल रुग्णालयामध्ये हलवण्यात येणार असल्याची माहिती बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या

  • रंगाबाद – २
  • मालेगाव – ५
  • पनवेल – २
  • कल्याण – डोंबिवली – १
  • ठाणे – ४
  • पालघर – १
  • नाशिक ग्रामीण – १
  • नाशिक शहरी – १
  • अहमदनगर – १
  • पुणे – १
  • वसई – विरार – १एकूण – ९२

    साताऱ्यात कोरोना रुग्णांचा आकडा २० वर

    सातारा परिसरातील ४० वर्षीय महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २० वर पोहोचला आहे.

    - Advertisement -

    हेही वाचा – धक्कादायक : मालेगावात २२ वर्षीय तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -